सई, प्रसाद, समीर आणि ईशाची पतंग हवेत उडाली!


‘गुलकंद’ या बहुचर्चित चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर करण्यात आली होती, आणि या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संक्रांतीच्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने एक खास मोशन पोस्टर प्रदर्शित करत प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पतंगांच्या उंच भरारीत वेगळीच गुंतागुंत

मोशन पोस्टरमध्ये सई, समीर, प्रसाद आणि ईशा यांची पतंग उंच आकाशात उडताना दिसत आहे. मात्र, या पतंगांमध्ये काही गमतीशीर गुंतागुंतही आहे. कधी सई आणि समीर, कधी सई आणि प्रसाद, तर कधी समीर आणि ईशा यांची पतंग एकत्र दिसत आहेत. कोणाची पतंग कुठे जात आहे, याचा रहस्याचा उलगडा चित्रपट पाहिल्यावरच होईल.

चित्रपटाची बहुचर्चित स्टारकास्ट

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

संक्रांतीनिमित्त ‘गुलकंद’च्या टीमकडून प्रेक्षकांना शुभेच्छा

सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद’ चित्रपटाचे निर्माते सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया आहेत. प्रेक्षकांना या चित्रपटाचा आनंद लुटण्यासाठी १ मेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Leave a comment