
‘लक्ष्मी निवास’ या लोकप्रिय महामालिकेत भव्य मंगलकार्याची जय्यत तयारी जोरात सुरू आहे. जयंत आणि जान्हवी कुटुंबासोबत पूजेसाठी एकत्र आले आहेत. दुसरीकडे, सिद्धूही भावनासाठी खास पूजा करताना दिसतो. लक्ष्मी हुशारीने रवी आणि सुपर्णाला आनंदीला भावनाकडे नेण्यासाठी राजी करते. आनंदीला घरी परतल्यावर संतोष भावनाशी वाद घालतो, पण लक्ष्मी आणि श्रीनिवास तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

सिद्धू मात्र त्याच्या आईने सुचवलेल्या मुलींना नकार देत आहे. याच वेळी त्याला भावनाचा फोन येतो आणि ती त्याचे आभार मानते. दरम्यान, जयंत आणि श्रीनिवास एकमेकांना लग्नाची पत्रिका देतात. जान्हवी आपल्या लग्नाची पत्रिका विश्वाला पोहोचवण्याचा प्रयत्न करते, पण त्याचा तिला काही प्रतिसाद मिळत नाही. लक्ष्मी सिद्धूलाही लग्नाचे निमंत्रण देते. लक्ष्मीला जान्हवीच्या लग्नाची काळजी आहे, पण श्रीनिवास तिचे सांत्वन करत धीर देतो.
आता सगळेच जयंत आणि जान्हवीच्या भव्य लग्न सोहळ्यासाठी तयार होत आहेत. हे क्षण सगळ्यांनाच भावूक करत आहेत.
जान्हवी आणि जयंतच्या भव्य मंगलकार्याचा आनंद घेण्यासाठी तयार व्हा!
या महत्त्वाच्या क्षणी लक्ष्मी निवासमध्ये खूप काही रंजक घडणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ‘लक्ष्मी निवास’ दररोज रात्री ८ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.
