नाशिकच्या गोदा आरतीमधे तल्लीन झाले ‘सावली होईन सुखाची’ मालिकेचे कलाकार

‘सावली होईन सुखाची’ या मालिकेत बघायला मिळणार गोदावरीची महाआरती

‘सन मराठी’ वरील ‘सावली होईन सुखाची’ मालिकेच्या नव्या पर्वात राधा म्हणजेच बिट्टी आणि विराजस यांची मैत्री अधिक फुलताना पाहायला मिळते. मात्र मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. राधा आणि विराजस यांच्या मैत्रीत एक वेगळं वळण येणार असल्याचं संकेत मिळत आहेत. विराजसला वडिलांच्या अटी आणि बिझनेसच्या जबाबदाऱ्यांमुळे बिट्टीसोबत सतत राहता येणार नाही. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता वाढत आहे.

गोदावरी घाटावर शूटिंग

नुकताच मालिकेचा एक भाग नाशिक येथील गोदावरी घाटावर शूट करण्यात आला. यावेळी गोदा आरतीत सहभागी होण्याचा मान कलाकारांना मिळाला. गोदा आरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने ही आरती मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पाहण्याचा प्रेक्षकांना योग येणार आहे. ही महाआरती पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर सादर केली जाणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

प्रत्यक्ष लोकेशनवर शूटिंगचा अनुभव

मालिकेसाठी नेहमी सेट उभारला जातो, पण प्रत्यक्ष लोकेशनवर जाऊन शूटिंग करणं कलाकारांसाठी एक आव्हान असतं. मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेले अमेय बर्वे (विराजस) आणि प्रतिक्षा पोकळे (राधा) यांनी गोदा आरतीच्या शूटिंगचा अनुभव शेअर केला.

प्रतिक्षा पोकळेच्या शब्दात गोदा आरतीचा अनुभव

“मालिकेच्या निमित्ताने गेले काही महिने आम्ही नाशिकमध्ये राहतोय, पण यापूर्वी गोदा घाटावर जाण्याचा योग आला नव्हता. या भागाचं शूटिंग करताना गोदा आरतीचा अनुभव खूप वेगळा होता. भाविक तल्लीन होऊन आरतीचा आनंद घेत होते. त्या ठिकाणी जाऊन मनाला शांतता आणि नवीन ऊर्जा मिळाली. शूटिंगदरम्यान प्रेक्षकांनी दिलेली पोचपावती खूप खास होती. हा दिवस माझ्यासाठी न विसरण्यासारखा ठरला.”

राधा-विराजसच्या नात्याचा नवीन अध्याय

राधा आणि विराजस यांचं नातं जसं पुढे जाईल, तसं ते अधिक फुलणार आहे. बिट्टीला विराजससोबत कायम राहण्याची इच्छा आहे, पण त्यांच्या नात्याचं पुढील वळण काय असेल हे पाहणं रंजक ठरेल.

पाहा ‘सावली होईन सुखाची’ सोम ते रवि संध्याकाळी १०:३० वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.

Leave a comment