
‘शिवा’ या मालिकेत लवकरच आशु आणि नेहाच्या लग्नाची शहनाही वाजणार आहे. सीताई आणि किर्ती आनंदात आहेत, पण रामभाऊ, लक्ष्मण, आणि उर्मिला यांची नाराजी उघड झाली आहे. मात्र, या सगळ्यात शिवा खूप खुश आहे. ती म्हणते, “आशु काय करतोय हे त्याला अजून कळत नाहीये, पण मला खात्री आहे की हळूहळू त्याला माझ्याबद्दलच्या भावना जाणवतील.” शिवा तिच्या मांजा आणि गॅंगला बजावते की आशुशी नीट वागायला हवं.
शिवाची समजूत आणि तिचा उत्साह
दरम्यान, दिव्या शिवाला आणि नेहाला एकत्र पाहते, ज्यामुळे तिचं अस्वस्थ होणं अपरिहार्य आहे. दुसरीकडे, रामभाऊ शिवाकडे माफी मागायला येतात, कारण ते तिच्यासाठी काहीही करू शकत नाहीत. मात्र, शिवा आणि तिच्या पाना गॅंगचं त्यांचं सांत्वन करणं दृश्य खूप हृदयस्पर्शी ठरतं.
आशु आणि शिवाची एकत्र कृती

रस्त्यावर एक आजारी बाई पडल्याचं दृश्य पाहून, शिवा आणि आशु एकत्र येऊन तिला वाचवतात. हा प्रसंग आशुच्या शिवाबद्दलच्या भावना अजून वाढवतो. दरम्यान, आशुच्या लग्नाच्या पत्रिका छापून येतात आणि त्या मंदिरात ठेवण्यासाठी सगळ्यांची उपस्थिती ठरते. यावेळी सीताई, आशु, आणि शिवा समोरासमोर येणार आहेत.
सीताईच्या सुरक्षेसाठी शिवाचा उग्र अवतार
मंदिरात किर्तीच्या चुकीमुळे झालेल्या गोंधळात, एक व्यक्ती सीताईच्या अंगावर जातो. शिवा त्याला चांगलाच धडा शिकवते, ज्यामुळे तिचा राग आणि तिचं कणखरपण पुन्हा एकदा समोर येतं.
दिव्या आणि किर्तीचा शिवाविरोधातील कट

दिव्या आणि किर्ती मिळून शिवाची बदनामी करण्याचा अजून एक प्रयत्न करतात, पण नेहमीप्रमाणे शिवा त्यांच्या कटांना उधळून लावते. शिवाने आशुसाठी केलेल्या गोष्टी मुद्दामच नेहा पुन्हा करते, ज्यामुळे आशुला शिवाची आणखीन आठवण येते.
आशु आणि नेहाच्या लग्नाच्या या वादळी प्रसंगांमध्ये शिवा नेमकं काय धुमाकूळ घालेल, हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘शिवा’ दररोज रात्री ९ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर!
