भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” या गाण्याने केला १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार

प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांच्या आवाजातील “स्वामी” गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग, गाण्याने गाठला १ मिलियन व्ह्यूजचा मोठा टप्पा!

स्वामींचा संदेश आत्मविश्वास जागवणारा आहे, आणि याच भावनेने प्रेरित भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालण्यात यशस्वी ठरलं आहे. हृदयस्पर्शी, भावनिक आणि प्रेरणादायी अशा या गाण्यात अभिनेता प्रशांत गवळी, अभिनेत्री पुनम पाटिल, बालकलाकार शंभो आणि सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी आपली भूमिका साकारली आहे.

स्वामी” गाण्याच्या निर्मिती मागील प्रेरणा

हे गाणं गायक अवधूत गांधी यांनी गायलं असून ब्रम्हा यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन, गीतरचना आणि रॅप गायन केलं आहे. तसेच, गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा मनिष महाजन यांनी सांभाळली असून निर्मिती प्रशांत गवळी यांनी केली आहे.

गायक अवधूत गांधी सांगतात “स्वामी” गाण्याच्या रेकॉर्डिंगचा किस्सा!

गायक अवधूत गांधी यांनी गाण्याच्या यशाबद्दल उत्साहाने सांगितलं की, “स्वामी हे गाणं प्रदर्शित होताच १ मिलियन व्ह्यूज पार करणे, हे स्वामींचा आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटतं. श्रद्धा असेल आणि मेहनत घेतली, तर देव हमखास पावतो, असं म्हणतात. मी कोणतंही काम करायला जाण्याआधी आई-वडिलांचा आणि स्वामींचा आशीर्वाद घेतो. या गाण्याच्या रेकॉर्डिंगला जाण्यापूर्वीही मी स्वामींचं स्मरण केलं होतं.

गाण्याच्या प्रमोशन दरम्यान अनेक प्रेक्षक भेटले, आणि त्यांना हे गाणं अतिशय भावलं. सोशल मीडियावरही उत्तम प्रतिसाद मिळत असून गाण्याने १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. याबद्दल संपूर्ण टीमचं अभिनंदन आणि प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार!”

दिग्दर्शक मनिष महाजन यांनी उलगडला गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभव

“स्वामी” गाण्याच्या संपूर्ण निर्मिती प्रक्रियेत खूप आनंद मिळाला. हे गाणं पुण्यात चित्रित करण्यात आलं आहे. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे.

“हे २०२५ मधील भैरवा फिल्म्सचं पहिलंच गाणं आहे, आणि ते १ मिलियन पार गेलं, याहून आनंददायक गोष्ट कोणती असू शकते! आम्ही प्रेक्षकांच्या प्रेमासाठी आभारी आहोत आणि लवकरच नवी गाणी घेऊन येणार आहोत,” असं दिग्दर्शक मनिष महाजन यांनी सांगितलं.

👉 पाहा “स्वामी” गाणं आणि अनुभवा त्याचा मंत्रमुग्ध करणारा प्रभाव:
🔗 YouTube लिंक – “स्वामी” गाणं पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment