संस्कृती बालगुडेच्या ‘Courage’ चित्रपटाचे अमेरिकेत विशेष स्क्रिनिंग!

मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. नृत्य, फॅशन आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संस्कृतीचा पहिला इंग्रजी चित्रपट ‘Courage’ आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजतोय.

या चित्रपटाची संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील (USA) सँटो डोमिन्गो फिल्म फेस्टिव्हलमध्ये अधिकृत निवड झाली असून, या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग तिथे संपन्न झाले.

संस्कृतीच्या अभिमानास्पद प्रवासाची सुरुवात!

या गौरवशाली क्षणाबाबत संस्कृती बालगुडे सांगते, “एक मराठी अभिनेत्री म्हणून एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणं, भारताचे प्रतिनिधित्व करणं, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे. त्याचसोबत जबाबदारीसह एक प्रकारचं दडपणही आहे. पण मी यासाठी खूप उत्सुक आहे!”

‘Courage’ हा इंग्रजी चित्रपट सुप्रसिद्ध दिग्दर्शक अंकुर काकतकर यांनी दिग्दर्शित केला असून, डॉ. उदय देवस्कर आणि सुशांत तुंगारे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Courage’ – स्त्रीप्रधान सशक्त कथा! “मी नेहमीच वेगळ्या विषयांवर काम करायला उत्सुक असते. माझी इच्छा होती की, एक स्त्रीप्रधान चित्रपट करावा आणि ‘Courage’ माझ्या वाट्याला येणं हे भाग्याचं आहे.”

‘Country of Honor’ या विशेष विभागात आमच्या चित्रपटाला स्क्रिनिंग मिळालं आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही संपूर्ण टीम या चित्रपटाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इथे आलो आहोत, याचा मला खूप अभिमान वाटतो.”

संस्कृती बालगुडे – वेगळ्या वाटेवरचा प्रवास!

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. नेहमी काहीतरी वेगळं करण्याची तिची वृत्ती दिसून येते. हा तिचा पहिलाच इंग्रजी चित्रपट असूनही तो जगभरात चर्चेत आहे आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळवत आहे.

संस्कृतीच्या ‘Courage’ ची जागतिक पातळीवर होत असलेली दखल तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतेय.

येत्या काळात ती आणखी कोणत्या नव्या प्रोजेक्ट्समध्ये झळकणार? हे पाहणं तितकंच रोमांचक ठरणार आहे! 🎬✨

Leave a comment