सिनेमागृहांत पुन्हा प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट “बाईपण भारी देवा”

महिला दिनाच्या दिवशी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस! !

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२५: जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला सर्वाधिक यशस्वी चित्रपट बाईपण भारी देवा आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे! महिला दिनाच्या खास निमित्ताने, ७ मार्च २०२५ पासून हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, हा सध्याच्या काळातील पुनःप्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे.

७६.५ कोटींची जबरदस्त कमाई करणारा ऐतिहासिक चित्रपट!

२०२३ मध्ये प्रदर्शित होताच बाईपण भारी देवा ने मराठी बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १२.५ कोटींचा गल्ला जमवला होता. एका दिवसात ६.१० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला.

💥 एकूण कमाई: ७६.५ कोटी (मराठीतला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट)
💥 पहिल्या आठवड्यातील कमाई: १२.५ कोटी
💥 दुसऱ्या रविवारी सर्वाधिक कमाई: ६.१० कोटी

बाईपण भारी देवा प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले तरीही, आजही प्रेक्षकांचा उत्साह कमी झालेला नाही. अजूनही थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मागणी कायम आहे.

“छावा” चित्रपटासोबत ट्रेलरचा खास जल्लोष!

आणखी एक खास गोष्ट म्हणजे, आज विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटासोबत बाईपण भारी देवा चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याचा आनंद मिळणार आहे.

केदार शिंदे यांचे विशेष वक्तव्य:

“बाईपण भारी देवा हा चित्रपट माझ्यासाठी नेहमीच खास राहील. प्रेक्षकांनी आम्हाला दिलेलं प्रेम आणि हा सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये अनुभवण्याची संधी मिळणं हे आमच्यासाठी आनंददायक आहे. जिओ स्टुडिओजच्या सहयोगाने, हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने, सगळ्या महिलांनी आपल्या सख्यांसोबत हा आनंद पुन्हा अनुभवावा. ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही, त्यांच्यासाठी हा उत्तम संधी असेल.”_

७ मार्च २०२५ पासून पुन्हा थिएटरमध्ये!

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले, ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सहनिर्मित बाईपण भारी देवा मध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब चौधरी, आणि सुकन्या कुलकर्णी मोने यांच्या दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत.

चित्रपटाला साई-पियूष यांनी संगीतबद्ध केलं असून, वैशाली नाईक यांनी संवादलेखन केलं आहे.

💥 ७ मार्च २०२५ पासून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, बघायला विसरू नका! 💥

Leave a comment