
मुंबई, दिनांक 17 फेब्रुवारी 2025 – शंभुराजे प्रतिष्ठान आणि ॲम्बीशन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर, राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट शालेय विद्यार्थ्यांना मोफत दाखवण्यात आला.
या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेच्या अद्वितीय गाथेची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मान्यवरांचे योगदान
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरव दरेकर, सूरज सर, संदेश सर, संदीप जाधव आणि राजू लोणे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे आयोजन आदेश दरेकर यांनी केले होते.
इतिहासाची जाणीव नव्या पिढीला देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट विद्यार्थी व युवकांसाठी ऐतिहासिक प्रेरणादायी चित्रपट आहे. या उपक्रमाद्वारे नव्या पिढीला आपल्या इतिहासाची आणि स्वराज्य निर्मितीसाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव होईल.
हा उपक्रम भविष्यातही सुरू ठेवण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.
