सरकार-सानिकाच्या विरोधात उभं ठाकलं कळशीगाव!

कलर्स मराठीवरील लय आवडतेस तू मला या मालिकेत साहेबरावांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर सगळ्या समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. सरकार, सानिका आणि संपूर्ण धुमाळ कुटुंब आप्पांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. मात्र, या कठीण परिस्थितीतही सरकार सानिकाची पुरेपूर काळजी घेत आहे. तिला कधीच एकटं वाटू नये, याची तो पूर्ण काळजी घेतो. तिचा आनंद कायम टिकवण्यासाठी तो वेगवेगळे प्रयत्नही करत आहे.

गावकऱ्यांचा सरकार-सानिकावर रोष!

साहेबरावांनी फॅक्टरी बंद केल्यानंतर कळशी गावातील अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये असलेला रोष आता सरकार आणि सानिकावर उतरत आहे. पूर्ण कळशीगाव आता त्यांच्याविरोधात उभं ठाकलं आहे. या परिस्थितीचा धक्का सरकारच्या घरच्यांना तेव्हा बसतो, जेव्हा सई कमलला सांगते की गावाने संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकलं आहे—घरातील लाईट, पाणी, किराणा सगळं बंद केलं आहे!

सानिकाला दोष, पण सरकारचा ठाम पाठिंबा

कमल या सर्व परिस्थितीला सानिकाला जबाबदार ठरवते, पण सरकार मात्र आपल्या पत्नीच्या पाठीशी ठाम उभा आहे. प्रत्येक कठीण प्रसंगात जसं तो तिच्या सोबत होता, तसाच आजही आहे. मात्र, आता या अडचणींवर मात करून दोघे कशी वाट काढणार? गावकऱ्यांचा विश्वास पुन्हा कसा मिळवणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना पुढील भागांमध्ये मिळणार आहेत.

व्हॅलेंटाईन स्पेशल, पण सईचा डाव!

सरकारच्या घरात अजूनही सानिकाला सर्वांनी स्वीकारलेलं नाही. सई अजूनही तिच्या विरोधात आहे, आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे कमलला तिच्या विरोधात भडकवणं. लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डेला खास करण्यासाठी बाबू आणि विभा सरकार-सानिकासाठी एक सरप्राईज प्लॅन करतात. पण हे समजताच सई त्यांच्या प्लॅनवर पाणी फेरण्यासाठी काहीतरी नवीन डाव खेळणार आहे!

गावाच्या रोषावर मात करण्यासाठी नवा मार्ग?

गावाने वाळीत टाकल्याची बातमी समजताच सरकार आणि सानिकाला अस्वस्थ वाटतं. ते दोघं या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा करतात. मात्र, गावकऱ्यांनी पूर्णपणे टोकाची भूमिका घेतली आहे आणि ते ऐकायला तयार नाहीत. सानिकावर आता जबाबदारी वाढली आहे—ती घरातील सून म्हणून आणि सरकारच्या जोडीदार म्हणून आपल्या कर्तव्याची पूर्तता कशी करणार? घरातील मूलभूत गरजा भागवण्यासाठी सरकार-सानिका कोणता नवा मार्ग अवलंबतील?

हे जाणून घेण्यासाठी बघत राहा #लयआवडतेसतूमला दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर!

Leave a comment