सेलिब्रिटींसोबत करा जगभर सैर – प्रवासप्रेमींसाठी अनोखा अनुभव

सॉलिट्यूड हॉलिडे ॲप : प्रवासाचा नवा अध्याय!

प्रवासप्रेमींना अधिक रोमांचक आणि संस्मरणीय अनुभव देण्यासाठी सॉलिट्यूड हॉलिडे हे नव्या युगाचे ट्रॅव्हल ॲप सादर करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून आता सेलिब्रिटींसोबत जगभर प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या या ॲपमुळे वापरकर्ते आपल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार प्रवासाचे नियोजन करू शकतात.

प्रवासाचा स्मार्ट प्लॅटफॉर्म – ट्रॅव्हल लव्हर्ससाठी खास सेवा

सॉलिट्यूड हॉलिडे ॲप प्रवाशांना जगभरातील अनोखी स्थळे शोधण्याची आणि त्यांचे खास क्षण संग्रहित करण्याची संधी देते. या ॲपमध्ये कम्युनिटी फोरम नावाचे एक खास फीचर आहे, जिथे प्रवासी इतर ट्रॅव्हलर्सशी संवाद साधू शकतात, अनुभव शेअर करू शकतात आणि प्रवासासंदर्भातील सल्ले घेऊ शकतात.

सेलिब्रिटी टूर्स – आवडत्या कलाकारांसोबत प्रवासाची संधी

या ॲपच्या सर्वात खास वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे सेलिब्रिटी टूर्स. यामध्ये प्रवाशांना त्यांच्या आवडत्या कलाकारांसोबत प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. फक्त प्रवासच नाही, तर त्यांच्यासोबत खास क्षण अनुभवता येतील, त्यांच्या प्रवासाच्या गमती-जमती समजतील आणि एक अनोखा ट्रीपिंग अनुभव मिळेल.

भव्य सेलिब्रिटी टूर्स – २०२४-२५ चं खास शेड्यूल

🗓️ एप्रिल – हिंदी अभिनेता मनमोहन यांच्यासोबत नेपाळ टूर
🗓️ मे – मराठी अभिनेता ओमप्रकाश शिंदे यांच्यासोबत काश्मीर टूर
🗓️ जून – प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्यासोबत विशेष टूर
🗓️ सप्टेंबर – अभिनेत्री सायली संजीव यांच्यासोबत मालदीव टूर
🗓️ ऑक्टोबर – मराठी व हिंदी अभिनेत्री अभिज्ञा भावे यांच्यासोबत एक्सक्लुसिव्ह टूर
🗓️ नोव्हेंबर – मराठी अभिनेता यशोमन आपटे यांच्यासोबत मेघालय टूर

स्मार्ट बुकिंगसाठी सोपा आणि सुलभ पर्याय

सॉलिट्यूड हॉलिडे ॲपद्वारे प्रवाशांना त्यांच्या ट्रीपचे सुलभ नियोजन करता येईल. प्रवास बुकिंगसाठी ॲपद्वारे बुकिंग करता येईल, तसंच तुम्ही फोनवर किंवा ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊनही बुकिंग करू शकता.

सॉलिट्यूड हॉलिडेच्या सीओओ गार्गी फुले सांगतात –
“आम्ही प्रत्येक प्रवाशाला

त्यांच्या स्वप्नातील प्रवास साकार करण्याची संधी देत आहोत. प्रवासाचे नियोजन अधिक सोपे, सुलभ आणि आनंददायी बनवणे आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या विविध टूर्समुळे प्रवाशांना आवडत्या कलाकारांसोबत जगभर फिरण्याचा अनोखा अनुभव मिळेल, ज्यामुळे प्रवास अधिक खास आणि अविस्मरणीय ठरेल.”

🌍 तुम्हीही सेलिब्रिटींसोबत तुमचा स्वप्नातील प्रवास अनुभवण्यासाठी ‘सॉलिट्यूड हॉलिडे’ ॲप डाउनलोड करा आणि तुमची ट्रीप आजच बुक करा! ✈️

Leave a comment