
श्रेयस तळपदे झी मराठीवर पुन्हा झळकणार
‘चल भावा सिटीत’ ह्या बहुचर्चित शोच्या एका प्रोमोमध्ये एक व्यक्ती पाठमोरी चालताना दिसते, ज्यावर कॅप्शन असं होतं – “तो येतोय शो गाजवायला! कोण बरं असेल तो? कंमेंट्समध्ये सांगा!” यावर अनेक युजर्सनी ‘श्रेयस तळपदे’ अशी कमेंट केली.
लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेची मोठी पुनरागमनाची बातमी
मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता ‘श्रेयस तळपदे’ पुन्हा एकदा झी मराठीवर आणि छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यांच्या फॅन्ससाठी ही एक आनंदाची बातमी आहे, कारण झी मराठीच्याच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या सुपरहिट मालिकेतील यश-नेहा जोडी खूप गाजली होती.
श्रेयस तळपदे नवा रिॲलिटी शो होस्ट करणार

यावेळी श्रेयस ‘चल भावा सिटीत’ या नव्या रिॲलिटी शोचा होस्ट म्हणून दिसणार आहे आणि आपल्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वाने शोमध्ये रंग भरताना दिसणार आहे.
शीर्षकगीत गाजतंय, श्रेयसचा हुक स्टेप प्रेक्षकांच्या पसंतीस
या कार्यक्रमाचं भन्नाट शीर्षकगीत नुकतंच झी मराठीच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम पेजवर रिलीज करण्यात आलं. या शीर्षकगीतातील श्रेयसची हुक स्टेप आणि त्याचा लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
ग्रामीण आणि शहरी जीवनाचा अनोखा संगम
या शोमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील स्पर्धक एकत्र येणार असून, त्यांना अशा आव्हानांना सामोरे जावे लागेल जिथे त्यांना आपल्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्यास प्रवृत्त केलं जाईल.
महाराष्ट्राची संस्कृती आणि समृद्धी यांचा अनोखा मिलाफ
ग्रामीण आणि शहरी भागातले स्पर्धक एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतील आणि त्यांना आव्हान देतील. ‘चल भावा सिटीत’ हा कार्यक्रम ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती दर्शवेल.
मराठी टेलिव्हिजनवर रिॲलिटी शोची परिभाषा बदलणारा कार्यक्रम
सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार, हे प्रेक्षकांना हळूहळू उलगडत जाईलच. अशा एका अफलातून संकल्पनेवर आधारित हा शो प्रेक्षकांना नक्कीच एक नवा अनुभव देईल.
१५ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला!
📺 तेव्हा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाचे रंग उधळणारा नवा कार्यक्रम ‘चल भावा सिटीत’ १५ मार्चपासून दररोज रात्री ९.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर! 🎬✨
