
मराठी सिनेसृष्टीने नेहमीच आशयघन आणि सामाजिक भान जागवणारे चित्रपट दिले आहेत. त्याच धाग्यातील एक संवेदनशील, प्रेरणादायी आणि वास्तवाशी भिडणारा चित्रपट म्हणजे ‘नयन’, जो २१ मार्च २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
नयन – कोकणातील एक तरुण आणि त्याची जिद्दीची कहाणी
गोपी एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि निर्मात्या अरुणा मोरे यांच्या निर्मितीमध्ये साकारलेला ‘नयन’ हा चित्रपट कोकणातील पार्श्वभूमीवर आधारित आहे. नृत्याची आवड असलेला ‘नयन’ हा तरुण केवळ स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही, तर तो जगभरातील अनेक तरुणांचे प्रतिनिधित्व करणारी कथा सांगतो.
लेखक-दिग्दर्शक अंकुश मोरे यांची कलात्मक मांडणी
चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन अंकुश मोरे यांनी केले आहे. सामाजिक वास्तवाला भिडणारी कथा त्यांनी अत्यंत सहजतेने मांडली आहे. चित्रपटाची पटकथा नारायण गोंडाळ यांची असून संकलन सुबोध सुधाकर नारकर यांनी केले आहे.
कलाकारांचा प्रभावी अभिनय आणि सशक्त सादरीकरण
चित्रपटात सिद्धेश पै, मोनालिसा बागल, सुहास पळशीकर, अंशुमाला पाटील, रिना लिमन, गणेश यादव, दीपक शिर्के, विजय पाटकर, प्रणव रावराणे, श्रीनिधी शेट्टी यांसारखे दर्जेदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
गाणी, संगीत आणि तांत्रिक बाजू
चित्रपटातील गाणी सुरेश वाडकर, जावेद अली, आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी आणि राहुल सक्सेना यांच्या आवाजात असून, संगीतकार विक्रांत वार्डे यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघम यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सिद्धार्थ पै, ध्वनी संयोजन सुनील पाटोळे, छायांकन डिओपी राजा फडतरे, कार्यकारी निर्माते महेश भारंबे, रंगभूषा दादाभाई सेना समुद्रे व संतोष चारी, वेशभूषा महेश यांची आहे.
‘नयन’ – तरुणांसाठी आरसा ठरणारी प्रेरणादायी कलाकृती
अंकुश मोरे म्हणतात, ‘नयन’ फक्त एका तरुणाची कहाणी नाही, तर समाजातील दुर्लक्षित आवाजाला प्रामाणिकपणे मांडणारी एक चळवळ आहे. ही कलाकृती आजच्या तरुणाईला जागं करेल, अंतर्मुख करेल आणि नवी दिशा दाखवेल.
‘नयन’ – २१ मार्चपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. नक्की पहा!
