
कलर्स मराठीवरील #लयआवडतेसतूमला मालिकेत सत्यनारायण पूजेच्या आयोजनानिमित्त सानिकाचा पारंपरिक अंदाज पाहायला मिळणार आहे. गावात रोजगार निर्माण करणाऱ्या सानिकाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या कर्तृत्वाला मिळणारी ही सामाजिक पोचपावती मालिकेच्या कथेला नवे वळण देणार आहे.
कुटुंबातील आनंद, पण सईचा कट पुन्हा रंगात
सत्यनारायण पूजेच्या तयारीला जोरात सुरुवात झाली आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंद साजरा करत असतानाही सई आणि मिनल पुन्हा कट रचताना दिसत आहेत. पूजेच्या वेळी सई गुरुजींसमोर सरकार आणि सानिकाच्या विवाहासंदर्भात प्रश्न उपस्थित करते, ज्यामुळे गुरुजी नाराज होतात आणि पूजा करण्यास विरोध करतात.
गावकऱ्यांनी सानिकाला दिला सन्मान, कमल नाराज
गावकऱ्यांनी आप्पांऐवजी सानिकाला दिलेल्या मान-सन्मानामुळे कमल नाराज होते. सानिकाच्या नेतृत्वाखाली गावात निर्माण होत असलेल्या रोजगार संधींमुळे तिचे कौतुक होत आहे. आप्पांनीही सानिकाच्या धडाडीचे कौतुक करून तिच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे.
सानिकावर वाढणारा दबाव आणि सईचा नवा डाव
सानिकाच्या प्रभावामुळे कमल अस्वस्थ आहे, तर सईने पुन्हा नवे डाव आखायला सुरुवात केली आहे. सरकार आणि सानिकाच्या नात्यावर याचा काय परिणाम होणार? ही उत्सुकता आता वाढली आहे.
पुढे काय घडणार? जाणून घ्या ‘लय आवडतेस तू मला’ मध्ये
गावात सानिकाचे नेतृत्व स्वीकारले जात असताना तिच्या वैवाहिक आयुष्यावर सतत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सईचा डाव, गुरुजींचा नाराजीचा सूर आणि कमलचा विरोध – या साऱ्याचा परिणाम काय होणार? हे जाणून घेण्यासाठी पाहा #लयआवडतेसतूमला, सोम ते शनि, रात्री ९.३० वा., फक्त आपल्या कलर्स मराठीवर.
