
मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरे आपल्या हटके स्टाईल आणि ग्लॅमरस लूकसाठी नेहमी चर्चेत असते. सध्या ती साऊथ, बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. तिच्या आत्मविश्वासपूर्ण आणि बोल्ड फोटोंनी नेहमीच चाहत्यांना घायाळ केलं आहे. आता अश्विनीने तिच्या हटके पेपर साडी फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
फॅशनवर आली ‘नवीन ब्रेकिंग न्यूज’

न्यूजपेपर प्रिंट साडी परिधान करत अश्विनीने आपलं सौंदर्य एका वेगळ्याच शैलीत खुलवलं आहे. हे फोटोशूट केवळ ग्लॅमरस नाही, तर एक प्रकारे फॅशन स्टेटमेंटही आहे. अशा हटके स्टाईलमध्ये फार कमी कलाकार दिसतात. अश्विनीने या लूकमध्ये स्वतःची एक सेन्सेशनल ओळख तयार केली आहे.
२०२५ ठरतंय अश्विनीच्या करिअरसाठी महत्त्वाचं वर्ष

या वर्षात ‘जिलबी’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेली अश्विनी आता ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ आणि ‘मी पाठीशी उभा’ यांसारख्या प्रसिद्ध मराठी सिनेमांमध्ये झळकणार आहे. हे दोन्ही सिनेमे याच वर्षात प्रदर्शित होणार असून, अश्विनीच्या ग्लॅमरस आणि दमदार व्यक्तिरेखांचा वेगळा प्रभाव प्रेक्षकांवर पडणार आहे.
फोटोशूटमधून दिसतोय आत्मविश्वास आणि सौंदर्याचा नवा अविष्कार
या पेपर साडी फोटोशूटमध्ये अश्विनीचा आत्मविश्वास, तिची स्टाईल सेन्स, ग्लॅमरस अदा आणि बोल्ड लूक सगळं काही खुलून आलं आहे. चाहत्यांच्या आणि सहकलाकारांच्या प्रतिक्रियांमुळे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
२०२५ अखेरपर्यंत अश्विनी ठरणार मराठी इंडस्ट्रीतील सेन्सेशनल चेहरा

या फोटोशूटमुळे अश्विनीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की ती स्टाईल आयकॉन म्हणून स्वतःचा ठसा उमटवत आहे. तिचा हा नवा लूक तिला मराठी सिनेसृष्टीतील हॉट आणि चर्चेत असणारी अभिनेत्री बनवणार आहे, यात शंका नाही.
फॅशनचा ट्रेंड सेट करणाऱ्या अश्विनीच्या या अदा अजून किती नावीन्य घेऊन येतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे!
