‘आतली बातमी फुटली’ मनोरंजनासाठी सज्ज

काही बातम्या सहज गप्पांमध्ये मिळतात, काही आतल्या गोटातून, तर काही अगदी अपघाताने. पण कोणतीही ‘आतली’ बातमी फोडायची म्हणजे चिकाटी, कौशल्य, कल्पकता आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं गरजेचं असतं. अशीच एक बातमी फुटल्याचं सध्या मराठी सिनेविश्वात जोरदार गॉसिप सुरु आहे – आणि ती बातमी नेमकी काय आहे, हे प्रेक्षकांना ६ जून रोजी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

विशाल पी. गांधी यांचा पहिला मराठी सिनेमा

‘आतली बातमी फुटली’ या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार यांनी केलं असून, याच चित्रपटातून विशाल गांधी मराठी दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. अनेक प्रसिद्ध ब्रँड्सच्या जाहिरातींमधून ओळख निर्माण केलेले आणि सुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्ससोबत कामाचा अनुभव असलेले गांधी आता ‘वीजी फिल्म्स’ या स्वतःच्या बॅनरअंतर्गत हा सिनेमा घेऊन येत आहेत.

कलात्मक बाजूवर भक्कम टीम

चित्रपटाच्या निर्मितीत विशाल पी. गांधी यांच्यासोबत ग्रीष्मा अडवाणी आहेत, तर सहनिर्माता अम्मन अडवाणी. सहयोगी दिग्दर्शक म्हणून जीवक मुनतोडे तर छायांकन अमित सुरेश कोडोथ यांचे आहे. संकलन रवी चौहान, संगीत एग्नेल रोमन यांचे असून कथा जैनेश इजरदार यांची आहे. पटकथा व संवाद लेखनात जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी आणि अद्वैत करंबेळकर यांचा सहभाग आहे.

तांत्रिक बाजू आणि वितरण

वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे आणि तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक, कास्टिंग डिरेक्टर जोकीम थोरास, कार्यकारी निर्माता अब्दुल खान आहेत. या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओज सांभाळत आहे.

सस्पेन्स आणि मनोरंजनाची मेजवानी

‘बातमी’ ही फक्त वाचण्याची गोष्ट नसून ती ‘फोडण्याची’ जबाबदारी स्वीकारलेले काही लोक असतात — आणि या सिनेमात अशीच एक बातमी कोण आणि कशी फोडते, हे पाहणं प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे.

६ जूनपासून ‘आतली बातमी फुटली’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे — बातमी वाचू नका, फोडा!

Leave a comment