स्टार प्रवाहाच्या कलाकारांचा गिरगाव शोभायात्रेत जल्लोषात सहभागी

गुढीपाडव्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आनंदोत्सव साजरा होत असताना, स्टार प्रवाहच्या लोकप्रिय कलाकारांनी गिरगाव येथील भव्य शोभायात्रेत सामील होऊन नववर्षाचं उत्साहात स्वागत केलं. या शोभायात्रेत सहभागी होत त्यांनी सणाच्या रंगतदार वातावरणात चारचाँद लावले.

प्रसिद्ध कलाकारांची पारंपरिक वेशभूषेत मनमोहक उपस्थिती

स्टार प्रवाहवरील कलाकार निवेदिता सऱाफ, शिवानी सुर्वे, अपूर्वा नेमळेकर, विशाल निकम, पूजा बिरारी, राज हंचनाळे, स्वरदा ठिगळे, शिवानी बावकर, आकाश नलावडे, विवेक सांगळे, मानसी कुलकर्णी, हरीश दुधाडे, शर्वरी जोग आणि अभिजीत आमकर या साऱ्यांनी पारंपरिक पोशाखात शोभायात्रेत सहभागी होत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

मराठमोळ्या परंपरेचं प्रतीक ठरलेली ‘स्टार प्रवाह’ दिनदर्शिका

या खास प्रसंगी स्टार प्रवाहच्या विशेष मराठी दिनदर्शिकेचं लोकार्पण ढोल-ताश्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडलं. मराठमोळ्या परंपरेचे दर्शन घडवणारी ही दिनदर्शिका स्टार प्रवाह कुटुंबातील कलाकारांच्या सुंदर छायाचित्रांनी सजवलेली आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांना खास भेट

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सादर करण्यात आलेली ही दिनदर्शिका ही केवळ एक वेळापत्रक नसून, मराठी संस्कृतीचा अभिमान व्यक्त करणारी खास भेट ठरली आहे. कलाकारांच्या सहभागामुळे शोभायात्रेला आणि दिनदर्शिकेच्या लोकार्पण सोहळ्याला विशेष रंगत आली.

Leave a comment