यंदाचा गुढीपाडवा स्वप्नील जोशीसाठी या कारणामुळे ठरला खास!

‘सुशीला – सुजीत’ टीमसोबत पुण्यात साजरा होणार पारंपरिक नववर्ष

अभिनय, निर्मिती आणि आपल्या विनोदी-भावनिक अंदाजामुळे प्रेक्षकांच्या मनात कायम जागा असणारा स्वप्नील जोशी यंदाच्या गुढीपाडव्याला एक खास अनुभव घेणार आहे. कारण, यंदा तो ‘सुशीला – सुजीत’ या आगामी मराठी चित्रपटाच्या टीमसोबत पुण्यात नववर्ष साजरं करणार आहे.

प्रमोशन आणि पारंपरिक उत्सव एकत्र

सध्या ‘सुशीला – सुजीत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला स्वप्नील सांगतो,
“दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडवा माझ्यासाठी तितकाच खास आहे. चित्रपटाच्या निमित्ताने मी दरवर्षी गिरगाव, दादर, ठाणे, डोंबिवली याठिकाणी होणाऱ्या नववर्ष शोभायात्रांमध्ये सहभागी होतो आणि तिथला माहोल अनुभवल्यावर जाणवतं की, गुढीपाडवा हा खरंतर एक सण नसून उत्सव आहे!”

पुण्यात खास सेलिब्रेशनची तयारी

“या वर्षी आम्ही ‘सुशीला – सुजीत’ टीमसोबत पुण्यात गुढीपाडवा साजरा करणार आहोत. मुंबईसारखाच उत्साह पुण्यातही असतो. आणि तो अनुभवण्यासाठी आम्ही सगळेच खूप उत्सुक आहोत,” असंही तो उत्स्फूर्तपणे सांगतो.

दुहेरी भूमिका आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा

या चित्रपटात स्वप्नील जोशी अभिनेता आणि निर्माता अशी दुहेरी भूमिका साकारत असून, त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा आणखीनच वाढल्या आहेत. उत्सवातही आपल्या प्रोजेक्टला जोडणारा आणि सण-उत्सवाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी नातं घट्ट करणारा हा गुण स्वप्नीलमध्ये ठळकपणे दिसतो.

‘शुभचिंतक’मध्ये देखील झळकणार स्वप्नील

‘सुशीला – सुजीत’ नंतर स्वप्नील ‘शुभचिंतक’ या गुजराती चित्रपटात झळकणार असून, तो आपली बहुपरिचित बहुभाषिक ओळख अधिक बळकट करताना दिसणार आहे.

सण, सिनेमा आणि सेलिब्रेशन यांचं हे सुंदर त्रिसूत्री नातं स्वप्नील जोशीच्या आयुष्यात यंदा गुढीपाडव्याला आणखी खास बनवतं आहे!

Leave a comment