
कलर्स मराठीवरील ‘लय आवडतेस तू मला’ मालिकेत सरकार आणि सानिकाचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडतो. या सोहळ्याने दोन्ही गावांमधील जुना वैर संपुष्टात येतो. साहेब राव देखील सानिकाला स्वीकारतात आणि सरकारला जावयाच्या नात्याने मान्यता मिळते.
हनीमून ट्रिपमधून नवीन सुरुवात

सरकारने सानिकासाठी खास हनीमून ट्रिपची आखणी केली असून, दोघे प्रेमाने आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना अनपेक्षित वळणं त्यांच्या वाट्याला येतात.
गूढ इशाऱ्यामुळे कुटुंबात चिंता
कुटुंबाला एका अनोळखी स्त्रीकडून धक्कादायक इशारा मिळतो. यामुळे सगळे चिंतेत पडतात. परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते आणि घरातील एका व्यक्तीला कठीण व्रत घ्यावे लागते.
अघोरी घटनांनी वाढते रहस्य
या धार्मिक व्रतासोबतच काही अघोरी घटना घडू लागतात, ज्यामुळे कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. सरकार आणि सानिका या संकटाच्या भोवऱ्यात अडकतात आणि एक नवीन संघर्ष सुरू होतो.

पुढे काय होणार?
हा गूढ डाव कोणाचा आहे? सरकार-सानिका यातून सुखरूप बाहेर पडणार का? हे जाणून घेण्यासाठी पाहा ‘लय आवडतेस तू मला’, सोम ते शनि, रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
