
रविवार दिनांक ३० मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एल. जे. ट्रेनिंग सेंटर, दादर पश्चिम, मुंबई येथे श्री. प्रशांत कडणे संचालित “स्टार कास्ट” या अभिनय अकॅडमीचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. या विशेष प्रसंगी मुंबईतील प्रसिद्ध हेअर ड्रेसर श्री. रमेश दादा बोऱ्हाडे यांच्या हस्ते या अकॅडमीचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनकर्त्यांचा सिनेक्षेत्राशी सखोल संबंध
श्री. रमेश दादा बोऱ्हाडे यांनी त्यांच्या ‘इरॉज’ या शॉपमध्ये मराठी आणि हिंदीतील अनेक दिग्गज कलाकारांचे हेअर स्टाईल डिझाइन केले आहेत. अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांचे लूक ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी केले आहे.
प्रशांत कडणे यांचा अनुभव नवोदितांसाठी ठरेल मार्गदर्शक
प्रशांत कडणे हे गेली ३६ वर्षे मराठी सिनेमा आणि टेलीव्हिजन इंडस्ट्रीत निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा “स्टार कास्ट” ऍक्टिंग अकॅडमीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांचा, मित्रपरिवाराचा आणि नातेवाईकांचा उत्स्फूर्त सहभाग
या सोहळ्याला प्रशांत सरांचे आजी-माजी विद्यार्थी, नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिकच उत्साहात पार पडला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग
कार्यक्रम यशस्वी होण्यात भैरवी प्रशांत कडणे, सोमनाथ सर, स्वप्निल दळवी, तेजस निवळकर, अभिजीत मळीक, विपुल म्हात्रे, सुबोध दळवी, सोनाली बुऱ्हाणपूरकर यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे प्रशांत सरांनी आवर्जून सांगितले.
मे महिन्यापासून प्रशिक्षण वर्ग सुरू होणार
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशांत कडणे यांनी घोषणा केली की, “स्टार कास्ट” ऍक्टिंग अकॅडमीचे प्रशिक्षण वर्ग येत्या मे महिन्यात सुरू होणार असून, येथून प्रत्येक विद्यार्थी एक उत्तम कलाकार म्हणूनच बाहेर पडेल, असा आमचा विश्वास आहे.
