२७ व्या सांस्कृतिक कलादर्पण चित्रपट महोत्सवला उत्साहात प्रारंभ

२७ वा चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण भव्य चित्रपट महोत्सवाची सुरुवात काल, सोमवार दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी उत्साहात झाली. उद्घाटन सोहळा प्रसिद्ध अभिनेते संतोष जुवेकर, निर्भिड लेखाचे संपादक व नाट्यनिर्माते कांतिलाल कडू, तसेच चित्रपट निर्माते दत्ताजी जवळगे यांच्या शुभहस्ते पार पडला.

मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाला गौरवशाली सुरुवात

या उद्घाटन सोहळ्याला नॅशनल अवॉर्ड विजेते चित्रपट दिग्दर्शक रमेश मोरे, शॉर्ट फिल्म परिक्षक पद्माकर गांधी, लेखक महेंद्र पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी विविध शॉर्ट फिल्म्सचे पुरस्कार वितरणही पार पडले.

कार्यकर्त्यांचे समर्पित आयोजन

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी खजिनदार सर्वेश सांडवे, स्पर्धा प्रमुख सुधीर सोमवंशी, व्यवस्थापक विकास मोजर तसेच कार्यकर्ते गणेश तळेकर, लव क्षीरसागर, पराग सारंग, प्रतीक बोले, आदर्श सातपुते, सागर पतंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. महोत्सवाचे सूत्रसंचालन तेजस्विनी मुंडये यांनी उत्तमरीत्या पार पाडले.

चित्रपट सादरीकरणाला चित्रपटसृष्टीतील मान्यवरांची उपस्थिती

विविध चित्रपटांच्या स्क्रीनिंगला अभिनेते गौरव मोरे, दिग्दर्शक समित कक्कड, दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर, लेखक संजय नवघिरे, दिग्दर्शक-निर्माते अजय भालेराव, तसेच तिरुपती बालाजी देवस्थानचे पुजारी उपस्थित होते.

संस्थापक चंद्रशेखर सांडवे यांचे आभारप्रदर्शन

कार्यक्रमाच्या समाप्तीला संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक चंद्रशेखर सांडवे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.

Leave a comment