
मुंबई, १० एप्रिल २०२५:
कलर्स मराठीवरील लोकप्रिय अध्यात्मिक मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ येत्या १२ एप्रिल रोजी रात्री ८.०० वा. हनुमान जयंतीनिमित्त एक विशेष भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा भाग गूढ, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी अनुभव देणारा असणार असून, त्यात स्वामी समर्थांच्या रूपातून हनुमंत तत्वाचा साक्षात्कार उलगडला जाणार आहे.
स्वामींच्या वाणीतून दैवत्वाचा गूढ संदेश
“जगात दैवत्व एकच, देवा देवात भेद केलास आत्मपरीक्षण कर” – स्वामी समर्थांचा हा अलौकिक संदेश या विशेष भागात प्रकट होतो. यातून केवळ भक्तिभाव नव्हे तर आत्मपरीक्षणाची प्रेरणाही प्रेक्षकांना मिळणार आहे. स्वामींच्या चमत्कारीक रूपातून भक्ती आणि शक्तीचं अद्वितीय दर्शन घडणार आहे.
अवधूतच्या संकटातून उलगडणार हनुमंत तत्व
या भागात ‘अवधूत’ नावाच्या एका मारुतीभक्ताची कथा केंद्रस्थानी आहे. तो इतर कोणत्याही देवतेला मानत नसतो आणि स्वामी समर्थांचा स्वीकार करत नाही. मात्र जेव्हा मंदिर उभारणीच्या कार्यात अडथळे येऊ लागतात, तेव्हा त्याला वाटतं की हे सर्व स्वामींच्यामुळे घडत आहे.
स्वामींच्या चमत्कारातून होणारा साक्षात्कार

नाट्यमय घटनांनंतर अवधूतला उमगतं की स्वामी समर्थ हेच हनुमंताचे साक्षात रूप आहेत. अखेर तो त्यांच्या पायाशी नतमस्तक होतो. त्याच्या परिवर्तनाचा हा प्रवास शक्तिरूप स्वामींच्या अद्भुत चमत्कारांमुळे घडतो.
इतिहासात डोकावणार एक प्रभावी क्षण
या भागात मारुती आणि भीमाच्या ऐतिहासिक भेटीचं प्रभावी रिक्रिएशन साकारण्यात आलं आहे, जे स्वामींच्या तेजस्वी स्वरूपाची अनुभूती देणारं आहे. ही दृश्यं केवळ भव्यतेसाठी नव्हे, तर भक्तांच्या मनात देवत्वाची सखोल ओळख निर्माण करतील.
मंदिर उभारणी आणि स्त्री सन्मानाचा संदेश
अवधूतला फक्त मंदिर उभारणीचं कार्य नव्हे, तर एका स्त्रीच्या सन्मानासाठी उभं राहण्याचं कार्य दिलं जातं. जसं हनुमानाने प्रभू श्रीरामासाठी सीतेच्या सन्मानासाठी संघर्ष केला, तसंच आधुनिक काळात स्वामी समर्थ भक्ताला एक नवा हेतू देतात.
भक्ती, शक्ती आणि समर्पणाचा त्रिवेणी संगम
या विशेष भागात भक्ती, शक्ती आणि समर्पण यांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळणार आहे. ही लीला केवळ डोळ्यांसाठी दृश्य नजारा न राहता, मनावर अमीट प्रभाव टाकणारा अध्यात्मिक अनुभव ठरणार आहे.
पाहा, जय जय स्वामी समर्थ – हनुमान जयंती विशेष भाग
१२ एप्रिल, रात्री ८.०० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर!
