
‘बाईपण भारी देवा’ च्या यशानंतर जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे पुन्हा एकदा धमाल कौटुंबिक मनोरंजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘झापुक झुपूक’ या आगामी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुखच्या हस्ते लाँच करण्यात आला असून, ट्रेलरने सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलाच उधाण आलं आहे.
बिग बॉसच्या आठवणी आणि सूरज चव्हाणचा मोठा क्षण
बिग बॉस मराठी सीझन ५ चा विजेता सूरज चव्हाण या चित्रपटाचा नायक असून, रितेश देशमुख आणि केदार शिंदे यांचं सूरजवर असलेलं प्रेम आणि विश्वास या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये स्पष्टपणे दिसून आलं. रितेश म्हणाले, “सूरजने बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवताच केदार भाऊंनी सांगितलं होतं की याच्यावर मी चित्रपट करणार. आज ती गोष्ट सत्यात उतरलेली पाहून अभिमान वाटतो.”
केदार शिंदेंची दूरदृष्टी आणि कलात्मक बांधणी
चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांगितलं की, “बिग बॉसचं काम पाहत असतानाच सूरजवर चित्रपट करायचा ठरवलं होतं. त्याच क्षणी ही ‘झापुक झुपूक’ची कल्पना डोक्यात आली. रितेश भाऊंना कल्पना सांगितली तेव्हा त्यांनी तात्काळ पाठिंबा दिला आणि आज आम्ही ट्रेलर घेऊन आलो आहोत.”
ट्रेलरमध्ये धमाल, ड्रामा, प्रेम आणि संगीताचा जबरदस्त तडका

‘झापुक झुपूक’ चा ट्रेलर तरुण प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. सूरज चव्हाणची स्टाईल, जुई भागवतसोबतची केमिस्ट्री, रोमँस, ऍक्शन, धमाल डायलॉग्स, आणि दोन गाण्यांची झलक – या सगळ्याचा परिपूर्ण मेळ या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. विशेषतः एक गाणं येत्या लग्नसराईत ‘हळद’ गाजवणार हे नक्की!
भक्कम स्टारकास्ट आणि हृदयाला भिडणारी गोष्ट
चित्रपटात सूरज चव्हाण आणि जुई भागवत यांच्यासोबत इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर आणि मिलिंद गवळी हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ही कथा प्रेम, संघर्ष, कौटुंबिक भावना आणि मनोरंजनाचा स्फोट घडवणारी ठरणार आहे.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित – ‘झापुक झुपूक’
निर्माती – ज्योती देशपांडे, सौ. बेला केदार शिंदे, दिग्दर्शक – केदार शिंदे
या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, आता संपूर्ण महाराष्ट्र २५ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे.
“झापुक झुपूक” – फॅमिली एंटरटेनमेंट, फुल टू राडा आणि सूरज चव्हाणचा धमाका, फक्त तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
