आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात ४१ चित्रपटांची मेजवानी- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची अधिकृत घोषणा

मुंबई, १५ एप्रिल २०२५ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला मराठी चित्रपट महोत्सव २१ ते २४ एप्रिल २०२५ दरम्यान पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे.

या महोत्सवात ४१ निवडक चित्रपट दाखवण्यात येणार असून यामध्ये सामाजिक, ऐतिहासिक, ग्रामीण, स्त्रीजीवन, पर्यावरण, बालविषयक, विनोदी, व्यावसायिक आणि ॲक्शन चित्रपटांचा समावेश आहे. हे सर्व चित्रपट विनामूल्य पाहता येणार असून प्रेक्षकांना ऑनलाईन आणि ऑफलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.

उद्घाटन आणि समारोप सोहळा :
२१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट ओपनिंग फिल्म म्हणून दाखवण्यात येणार आहे.
२४ एप्रिल रोजी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल.

ठिकाण :
रविंद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर आणि प्रायोगिक रंगमंच, पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई.

ठळक चित्रपट (निवडक वेळापत्रकानुसार) :

  • २२ एप्रिल: बाईपण भारी देवा, गोदाकाठ, पाणी, झॉलिवूड, पॉंडीचेरी, चोरीचा मामला
  • २३ एप्रिल: तेरव, बार्डे, पोटरा, जयंती, फनरल, गोदावरी, मी वसंतराव
  • २४ एप्रिल: वाळवी, पावनखिंड, जुन फर्निचर, वाय, मदार, कारखानिसांची वारी

परिसंवाद, कार्यशाळा आणि मुलाखती :

  • २२ एप्रिल: कौशल इनामदार यांची संगीत कार्यशाळा, हंसल मेहता यांची मुलाखत, चित्रपट तंत्रावर परिसंवाद
  • २३ एप्रिल: चित्रपट पत्रकार कार्यशाळा, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मराठी चित्रपटांचे स्थान, चित्रपट वितरण प्रणाली
  • २४ एप्रिल: मराठी चित्रपटांचे व्यावसायिक गणित, ओटीटी आणि मराठी चित्रपटांचे भविष्य

या महोत्सवामध्ये चर्चासत्रांपासून ते दर्जेदार चित्रपटांचं दर्शन घेता येणार आहे. हे एक सांस्कृतिक पर्व असून मराठी चित्रपट रसिकांसाठी एक सुवर्णसंधी आहे.

नोंदणी लिंक : https://evnts.info/chitrapatakafest2025
प्रवेश विनामूल्य | नोंदणी अनिवार्य

Leave a comment