
शशिकांत धोत्रे दिग्दर्शित “सजना” या आगामी मराठी चित्रपटातील “बुंगा फाईट” हे धमाकेदार गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. मराठमोळ्या गावरान भाषेचा आणि लोकसंगीताचा बहारदार संगम असलेलं हे गाणं प्रेक्षकांच्या तोंडपाठ झालंय. डान्स फ्लोअरपासून ते स्पर्धांपर्यंत सगळीकडेच हे गाणं वाजताना आणि त्यावर थिरकताना प्रेक्षक दिसत आहेत.
आनंद शिंदेंचा लाईव्ह परफॉर्मन्स, प्रेक्षकांचा टाळ्यांचा वर्षाव
या गाण्याला लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांचा दमदार आवाज लाभला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये आनंद शिंदे यांनी हे गाणं सादर करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा वर्षाव करत स्वागत केलं.
२.५ मिलियन व्यूजचा टप्पा पार
गाण्याचं आकर्षण इतकं आहे की “बुंगा फाईट” या गाण्याने केवळ काहीच दिवसांत २.५ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.
ओंकारस्वरूप – सुहास मुंडेची हिट जोडी
या गाण्याचं संगीत ओंकारस्वरूप यांचं आहे तर शब्द सुहास मुंडे यांनी लिहिले आहेत. गाण्यात लोकगीतातील थेटपणा आणि सणासुदीची उर्जा जाणवते.
सजना चित्रपट २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित
‘सजना’ चित्रपटाचं लेखन, संवाद, पटकथा, दिग्दर्शन आणि निर्मितीही शशिकांत धोत्रे यांनीच केली आहे. या चित्रपटाची कथा जितकी ग्रामीण, तितकीच ती दमदार आणि नाट्यमय आहे.
“सजना”चा माहोल आता ‘बुंगा फाईट’मुळे तापलाय!
हे गाणं ऐकल्यावर एकच शब्द आठवतो – “नादच नाय करायचा!”
सिनेमागृहात २३ मे रोजी भेट द्या ‘सजना’ला – आणि अनुभवा गावरान रांगडेपणातला नवा थरार!
