
पुणे, २६ एप्रिल २०२५ : पुणे टाइम्स फॅशन वीक २०२५ चा दुसरा दिवस समकालीन सिल्हेट्स, डिझाइनमधील विविधता आणि उदयोन्मुख प्रतिभेचा एक उत्साही सोहळा ठरला. पुणे टाइम्स फॅशन वीक २०२५ चा दुसरा दिवस नैसर्गिक कला आणि नजाकतीसह सादर झाला. दिवसाची सुरुवात एमआयजीए फॅशन इन्स्टिट्यूटने ‘उडाण २०२५’ सह केली — प्रायोगिक डिझाइन, ठळक अभिव्यक्ती आणि ज्वलंत रंगसंगतीने परिपूर्ण अशी एक क्रिएटिव्ह झलक, जी फॅशनमधील पुढील पिढीच्या visionaries वर प्रकाश टाकणारी होती. अक्षता हिने शोस्टॉपर म्हणून सर्वांचे लक्ष वेधले.
‘प्रीती जाजू लेबल’ने साधेपणातली मोहकता सादर केली
प्रीती जाजू यांच्या लेबलने क्लासिक कट्स आणि शांत सौंदर्यावर आधारित संग्रह सादर केला. श्रुती मराठेने शोस्टॉपर म्हणून मोहकता आणि सुसंस्कृततेचं दर्शन घडवलं.
‘ईश्वर्या’ कलेक्शनमधून स्त्रीत्वाची भव्य मांडणी
नंदिता यांनी आपल्या डिझाइनमध्ये विष्णूची ताकद, दुर्गेचे धैर्य, लक्ष्मीची एलिगन्स आणि गणेशाचे ज्ञान या अध्यात्मिक शक्ती एकत्र गुंफून ‘ईश्वर्या’ कलेक्शन सादर केलं. सोनाली कुलकर्णी, इशिता राज आणि प्रांजल प्रिया यांनी या व्हिजनला शोस्टॉपर म्हणून साकारलं.
‘पेशवाई श्रीमंत’ने पारंपरिकतेतून आधुनिकतेचा संगम साधला
‘पेशवाई श्रीमंत’ ब्रँडने || तदेव लग्नम् || या वेडिंग कलेक्शनमधून पारंपरिक नक्षीकाम आणि आधुनिक संवेदनशीलतेचं सुंदर मिश्रण सादर केलं. वैदेही परशुरामीने शोस्टॉपर म्हणून आपल्या तेजस्वी उपस्थितीने सगळ्यांचे मन जिंकले.
‘सॉलिटेरिओ’च्या भव्य फिनालेने झळाळली संध्याकाळ
संध्याकाळी सॉलिटेरिओने फ्यूजन ब्रायडलवेअरच्या आकर्षक सादरीकरणासह अर्चिता कोचरला मंचावर सादर केलं. निम्रत कौरने शोस्टॉपर म्हणून एलिगन्स आणि edge यांचं अप्रतिम मिश्रण साकारत दुसऱ्या दिवसाचा भव्य समारोप केला.
बबल कम्युनिकेशनचा प्रभावी सहभाग
पुणे टाइम्स फॅशन वीक २०२५ मध्ये बबल कम्युनिकेशनने अधिकृत मीडिया आणि इन्फ्लुएन्सर पार्टनर म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी प्रभावी कथा निर्माण करून, मीडिया दृश्यमानता वाढवून आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांशी थेट संवाद साधला.
