‘महाराष्ट्र दिनी’ सन मराठी वाहिनीचा अर्थपूर्ण बदल!


१ मे पासून वाहिनीच्या लोगोमध्ये बदल, प्रगतीशील महाराष्ट्राला मानवंदना

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या १०५ हुतात्म्यांना अभिवादन करत, महाराष्ट्राच्या ६५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘सन मराठी’ वाहिनीने एक महत्त्वाचं आणि भावनिक पाऊल उचललं आहे. १ मे २०२५ पासून या वाहिनीच्या लोगोच्या ठिकाणी बदल करण्यात येणार असून, तो TV पडद्याच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात झळकणार आहे.

‘आनंदाने मान उंचावूया’ हे ब्रीद वाक्य जपणाऱ्या ‘सन मराठी’ने वाहिनीच्या नव्या ओळखीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रगतीशीलतेला आणि सांस्कृतिक वैभवाला सलाम केला आहे.
वाहिनीवरील मालिकांपासून ते विशेष कार्यक्रमांपर्यंतची विविधता जशी प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे, तशीच या नव्या बदलालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वाहिनीने व्यक्त केला आहे.

Leave a comment