
सन मराठीचा बहारदार लाईव्ह शो मुंबईत
सन मराठी प्रस्तुत ‘मेळा मनोरंजनाचा’ हा धमाल कार्यक्रम ८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह, मिरा रोड पूर्व, ठाणे येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमातून ‘सन मराठी’ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत आहे.
हेमंत ढोमे करणार सूत्रसंचालन, आनंद शिंदेंच्या आवाजात मैफिल सजणार
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे करणार असून सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या दमदार लाईव्ह सादरीकरणाने या सोहळ्याची रंगत वाढणार आहे.
कलाकारांची धमाल उपस्थिती आणि प्रेक्षकांशी थेट संवाद
या कार्यक्रमात ‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कलाकार थेट प्रेक्षकांसमोर भेटीला येणार असून त्यांच्यासोबत गप्पा, सेल्फी आणि धमाल क्षण प्रेक्षक अनुभवू शकतील.
योगिता चव्हाण, माधुरी पवार यांचा जलवा
कार्यक्रमात अभिनेत्री योगिता चव्हाण आणि माधुरी पवार यांचा खास परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. माधुरी पवार हिची लावणी प्रेक्षकांची वाहवा मिळवणार हे नक्की!
सोनाली सोनावणे, रितेश कांबळे यांचे सादरीकरण
गायिका सोनाली सोनावणे आपल्या सुरेल गायनाने वातावरणात रंग भरणार आहे, तर रिलस्टार रितेश कांबळे याचा सुपर डान्स धमाल उडवणार आहे.
‘जुळली गाठ गं’ आणि ‘हुकुमाची राणी ही’ मालिकांच्या लोकप्रिय जोड्या थेट रॅम्पवर
या कार्यक्रमात धैर्य-सावी (जुळली गाठ गं) आणि राणी-इंद्रजीत (हुकुमाची राणी ही) यांच्या रोमँटिक डान्सने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालणार आहे.
प्रवेश विनामूल्य — प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य
हा कार्यक्रम प्रवेश विनामूल्य असून, प्रवेशाधिकार राखीव आहे. प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
प्रेक्षकांसाठी खास निमंत्रण — बातमीचा फोटोच बनू शकतो पास
तुम्ही या बातमीचा स्क्रीनशॉट/फोटो दाखवून कार्यक्रमात प्रवेश घेऊ शकता. ८ मे ची सायंकाळ खास बनवण्यासाठी सज्ज व्हा!
