“चिडिया”आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला चित्रपट २३ मे २०२५ पासून चित्रपटगृहात

विनय पाठक, अमृता सुभाष आणि प्रतिभावान बालकलाकारांचा दमदार अभिनय

अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये यशस्वी ठरलेला, भावनांनी भरलेला आणि आशावादाने झळाळणारा हिंदी चित्रपट “चिडिया” अखेर २३ मे २०२५ रोजी भारतात चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे आणि त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

शानू, बुआ आणि स्वप्नांची उड्डाण

‘चिडिया’ ही मुंबईतील चाळीच्या पार्श्वभूमीवर घडणारी दोन भावांची गोष्ट आहे — शानू आणि बुआ, जे आपल्या परिस्थितीपेक्षा मोठी स्वप्नं पाहतात. केवळ कल्पनाशक्ती, आईचं प्रेम आणि आजूबाजूच्या लोकांच्या साथीनं ते आपली स्वप्नं जगायला शिकतात. हा चित्रपट लहानग्यांच्या नजरेतून मोठं जग पाहण्याचा अनुभव देतो.

कलाकारांचा बिनीचा तळ

चित्रपटात विनय पाठक, अमृता सुभाष, इनामुलहक, ब्रिजेंद्र कला यांच्यासारखे कसलेले कलाकार असून त्यांच्यासोबत स्वर कांबळे, आयुष पाठक आणि हेतल गडा हे अत्यंत आश्वासक बालकलाकार आहेत. या सर्वांनी मिळून ‘चिडिया’ या स्वप्नांची उड्डाण घेणाऱ्या चित्रपटाला हृदयस्पर्शी रूप दिलं आहे.

निर्मिती आणि दिग्दर्शनाची भक्कम बाजू

चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन मेहरान अमरोही यांचं असून, की मीडिया वर्क्स आणि उदाहरणार्थ निर्मित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रस्तुती स्मायली फिल्म्सची असून, वितरण रिलायन्स एंटरटेनमेंट करत आहे. संगीत शैलेंद्र बर्वे यांचं आहे तर संकलन मोहित टाकळकर आणि कलादिग्दर्शन प्रितेश खुशवाह यांनी केलं आहे.

जागतिक गौरव

‘चिडिया’ या चित्रपटाने एक दशकांपूर्वीच आपली जागतिक सफर सुरू केली होती. या चित्रपटाला चेक रिपब्लिक, नेदरलँड्स, यूएसए, रशिया, इराण अशा अनेक देशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये विशेष गौरव मिळाला आहे.

दिग्दर्शक मेहरान अमरोही म्हणतात…

“चिडिया हे बालपणीच्या आठवणींचं प्रेमपत्र आहे. ही कहाणी उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. आशा कधी जुनी होत नाही — हेच शांतपणे आठवण करून देतो हा चित्रपट.”

२३ मेपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात ‘चिडिया’ — एक असा अनुभव जो मनाला स्पर्श करतो आणि स्वप्नांना उंच भरारी देतो.

Leave a comment