गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’

वामा’ चित्रपटातील जबरदस्त आयटम साँग प्रदर्शित

गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदांनी रंगत आणली
महाराष्ट्राची लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील हिने या गाण्यात तिच्या खास अदा, नखरे आणि एनर्जीने प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत. तिचा हॉट अंदाज, वैशाली सामंत यांचा दमदार आवाज, सुचिर कुलकर्णी यांचं संगीत आणि तरंग वैद्य यांचे बोल यामुळे हे गाणं चांगलंच गाजत आहे.

चित्रपटात स्त्री सन्मान आणि संघर्षाची कथा
‘वामा’ चित्रपटाची कथा स्त्री सन्मान, आत्मगौरव आणि संघर्षाभोवती फिरते. या चित्रपटात अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी प्रमुख भूमिकेत असून, तिच्यासोबत डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर आणि जुई बी यांच्याही भूमिका आहेत.

गाण्याचं चित्रीकरण थंडीत; गौतमीचा समर्पित परफॉर्मन्स
दिग्दर्शक अशोक कोंडके यांनी सांगितले की, हे गाणं चित्रपटाच्या कथेची गरज म्हणून घेतलं असून त्यासाठी गौतमीशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. उज्जैनमधील ४ डिग्री सेल्सिअस तापमानात हे गाणं शूट करण्यात आलं आणि गौतमीने अल्प वेळातच सराव करून धमाकेदार परफॉर्मन्स दिला.

निर्मात्यांचा विश्वास आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद
निर्माते सुब्रमण्यम के. यांनी या गाण्याबाबत समाधान व्यक्त करत सांगितलं की, या गाण्यामुळे चित्रपटाला एक वेगळीच उंची मिळाली आहे. गाण्याच्या टीमने दिलेल्या मेहनतीला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

२३ मे रोजी ‘वामा – लढाई सन्मानाची’ प्रेक्षकांच्या भेटीला
ओंकारेश्वरा प्रस्तुत आणि सुब्रमण्यम के. निर्मित हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांचं असून, स्त्री सन्मानाच्या मुद्द्यावर भाष्य करताना हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजनही करणार आहे.

Leave a comment