
‘सन मराठी’वरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ आणि ‘जुळली गाठ गं’ या दोन्ही मालिका रोज रात्री ८ ते ९.३० या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येतात. ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे – सावी आणि धैर्य यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे जाण्याच्या वाटेवर आहे.
प्रेमाची कबुली देणार धैर्य, साठी आखाड्यात उतरतो
या रोमांचक वळणात धैर्य अखेर सावीला कुस्तीच्या आखाड्यात प्रेमाची कबुली देणार आहे. सावीच्या मदतीसाठी तो स्वतःचा जीव धोक्यात घालून कुस्तीची स्पर्धा लढणार आहे. सध्या या मालिकेचं चित्रीकरण कोल्हापूरच्या प्रसिद्ध कुस्ती आखाड्यात सुरू आहे.
दामिनी मुजुमदारचं नवं आव्हान
सावी आणि तिच्या भावासमोर दामिनी मुजुमदार एक नवं आव्हान उभं करते. या संकटातून मार्ग काढण्यासाठी धैर्य शाळेसाठी लागणारी रक्कम गोळा करण्यासाठी कुस्ती स्पर्धा भरवण्याची कल्पना मांडतो. मात्र स्पर्धेच्या वेळी दामिनी अडथळे निर्माण करते, आणि अखेर धैर्य स्वतः आखाड्यात उतरून सावीच्या मदतीला धावून जातो.
प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न – सावी धैर्यचं प्रेम स्वीकारेल का?
धैर्यची ही धाडसपूर्ण कृती सावीचं मन जिंकेल का? सावी त्याचं प्रेम स्वीकारेल का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. मालिकेच्या आगामी भागांमध्ये एक रोमांचक भावनिक प्रवास उलगडणार आहे.
संकेत निकमने शेअर केला खास अनुभव
मालिकेत धैर्य हे पात्र साकारणारा अभिनेता संकेत निकम म्हणाला, “’जुळली गाठ गं’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. नुकतंच मालिकेच्या शूटिंगदरम्यान मला कोल्हापूरच्या अखाड्यात प्रत्यक्ष कुस्ती खेळण्याचा अनुभव मिळाला. त्यामुळे कुस्ती हा खेळ माझ्यासाठी नव्याने जिव्हाळ्याचा झाला.”
१०-१२ तास मातीतील तयारी आणि तीन दिवसांचं शूटिंग

“मी जवळपास १०-१२ तास मातीमध्ये होतो. जे खेळाडू माझ्यासोबत होते ते माझ्यापेक्षा धिप्पाड होते. त्यामुळे सुरुवातीला थोडं दडपण आलं, पण मला आत्मविश्वास होता. फाईट मास्टर आणि वस्ताद यांनी खूप मदत केली. तीन दिवस चाललेलं हे शूटिंग यशस्वीरीत्या पार पडलं आणि माझ्यासाठी हा एक संस्मरणीय अनुभव ठरला.”
प्रेक्षकांसाठी खास संदेश
संकेत निकम पुढे म्हणतो, “प्रेक्षक सोशल मीडियावर नेहमी विचारतात की सावी आणि धैर्य यांची गाठ कधी जुळणार? आता त्यांच्या प्रतीक्षेचा शेवट होणार आहे. लवकरच धैर्य सावीसमोर प्रेमाची कबुली देणार आहे. त्यामुळे हा खास भाग नक्की पाहा.”
