‘प्रवाह निर्धार, निसर्ग आधार’ — स्टार प्रवाहचा वृक्षारोपण उपक्रम

जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमा निमित्त स्टार प्रवाहचा स्तुत्य उपक्रम

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रवाह वाहिनीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला. ‘प्रवाह निर्धार, निसर्ग आधार’ या संकल्पनेखाली ब्रांद्रा परिसरात झाडे लावण्यात आली.

कलाकारांची हिरव्या मोहिमेला साथ

या उपक्रमात स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांतील कलाकारांनी सक्रिय सहभाग घेतला. ऋजुता देशमुख, रुपाली भोसले, अभिषेक रहाळकर, समृद्धी केळकर आणि कश्मिरा कुलकर्णी यांनी निसर्गरक्षणाचा संदेश देत झाडे लावली.

रुपाली भोसले यांचं पर्यावरणप्रेम

रुपाली भोसले म्हणाल्या, “प्रत्येकाने एक झाड लावावं, त्याचं संगोपन करावं. मी आज जे रोपटं लावलं त्याचं नाव ‘तथास्तु’ ठेवलं आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो, आपलं कर्तव्य आहे त्याचं रक्षण करणं.”

ऋजुता देशमुख यांचा अनुभव

अभिनेत्री ऋजुता देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं, “निसर्गाच्या सानिध्यात जाणं म्हणजे खरं सुख. या उपक्रमाचा भाग होणं हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.”

प्रेक्षकांना हिरव्या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन

हा उपक्रम केवळ एक वृक्षारोपण कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे. स्टार प्रवाहने प्रेक्षकांना देखील असा सकारात्मक पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.

Leave a comment