सुनिधी चौहानच्या आवाजात वडील-मुलीच्या नात्याला स्वर

वडील आणि मुलीच्या नात्याचा गोडवा व्यक्त करणं हे शब्दांत पकडणं तितकंसं सोपं नसतं. पण हेच नातं एका भावस्पर्शी गाण्यातून उलगडण्याचा प्रयत्न ‘अवकारीका’ या आगामी मराठी चित्रपटातून करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिने हे गाणं आपल्या हृदयस्पर्शी आवाजात सादर केलं आहे.

‘का रे बाबा’ या गीतातून बाप-लेकीच्या भावनांना साद

“का रे बाबा … का रे पप्पा
कुठे हरवल्या तुझ्या छान-छान गप्पा…
तू सांग ना तू सांग ना
तू सांग ना…. हा माझ्या बाबा”

अशा सुरेल ओळींनी सजलेलं हे गीत अरविंद भोसले यांनी लिहिलं आहे. श्रेयस देशपांडे यांच्या संगीतातून या भावना अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. वडिलांनी आयुष्यात दिलेली साथ आणि घेतलेले कष्ट याची जाणीव करून देणारं हे गीत प्रेक्षकांच्या मनाला भिडणार आहे.

फादर्स डेच्या निमित्ताने खास गिफ्ट ठरणारं गाणं

हे गीत गाताना विशेष अनुभव मिळाल्याचं सुनिधी चौहान यांनी सांगितलं. “या गीताने प्रेक्षकांच्या अंतर्मनाला स्पर्श करावा, अशी माझी अपेक्षा आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने हे गाणं वडील-मुलीच्या नात्याला दिलेली एक सुंदर भावनात्मक भेट ठरणार आहे.

‘अवकारीका’ चित्रपटा बद्दल

रेडबड मोशन पिक्चर प्रस्तुत ‘अवकारीका’ हा चित्रपट येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांनी केलं असून, निर्माते भारत टिळेकर आणि अरुण जाधव आहेत. सहनिर्माते म्हणून मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे आणि गीता सिंग यांचे योगदान आहे.

भावनांच्या प्रवाहात वाहत जाणारं गीत

‘अवकारीका’ चित्रपटातील हे गाणं केवळ एक संगीतमय कृती नसून, वडिलांच्या प्रेमाला आणि त्यांच्या अस्तित्वाला साद घालणारं एक मनाला भिडणारं गीत आहे. हे गाणं वडील आणि मुलीमधील अव्यक्त भावना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे.

Leave a comment