
मैत्रीची अनोखी गोष्ट
मैत्री ही कोणाशीही, कोणत्याही काळात जुळू शकते. अशाच एका निरागस मैत्रीची गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमर, अकबर आणि अँथनी यांच्या मैत्रीची ही धमाल गोष्ट रुपेरी पडद्यावर रंगणार आहे.
मनोरंजन आणि मस्ती यांचा ट्रिपल डोस
दिग्दर्शन योगेश जाधव यांचे असून लेखन प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आणि सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी यांनी हा चित्रपट सादर केला आहे. ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट २७ जून २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
हास्याची मेजवानी
हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी हास्याने भरलेली मेजवानी ठरणार आहे, असा विश्वास निर्माते अमोद मुचंडीकर यांनी व्यक्त केला आहे. यातील पात्रांच्या गमतीशीर प्रसंगांमधून प्रेक्षकांना मनमुराद हसायला मिळणार आहे.
त्रिकुटाची धमाल

या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर हे तिघं पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यांच्या जोडीला सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर यांच्यासह अनेक कलाकारांची मांदियाळी आहे.
मैत्रीतला संघर्ष आणि सच्चाई
या तिघा मित्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या धक्कादायक घटनांमुळे त्यांच्या मैत्रीची परीक्षा घेतली जाते. मात्र ते आपल्या नात्याला प्रामाणिक राहून परिस्थितीला कसे सामोरे जातात, हे या चित्रपटातून पाहायला मिळेल.
तांत्रिक बाजूंचे देखणं सादरीकरण
कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. संगीत चिनार-महेश आणि अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी, संकलन अथश्री ठुबे यांनी केले आहे. नृत्यदिग्दर्शन राजेश बिडवे, साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. वेशभूषा कीर्ती जंगम, रंगभूषा अतुल शिधये यांची असून गीतकार मंदार चोळकर आहेत. गायक रोहित राऊत आणि गायिका अपेक्षा दांडेकर यांनी गाणी गायली आहेत. कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे.
भाव-भावनांना साद घालणारी कहाणी
‘ऑल इज वेल’ हा तरुणाईच्या मनाला भिडणारा चित्रपट असून त्यात मैत्री, भावना, संघर्ष आणि संगीत यांचा सुरेख मिलाफ आहे. चित्रपटाचा अनुभव नेत्रसुखद आणि मनोरंजनाने परिपूर्ण ठरणार आहे.
