
‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिकेत नव्या वळणाची चाहूल
‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका सध्या प्रेक्षकांची लाडकी ठरत आहे. सत्याच्या आणि मंजूच्या लग्नानंतर सुरू झालेली संकटांची मालिका आता एका नव्या वळणावर पोहोचली आहे.
सत्यावर गुन्हा, मंजूचा संघर्ष
निवडणुकीतील विजयानंतर सत्यावर मुकादमला मारहाण केल्याचा आरोप होताच त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. मंजू सत्याचा जामीन मिळवण्यासाठी धडपड करत असतानाच न्यायालयीन प्रक्रियेत एका नव्या पात्राची एंट्री घडते.
सरकारी वकील म्हणून अक्षया नाईकची दमदार एन्ट्री
या महत्त्वाच्या वळणावर अभिनेत्री अक्षया नाईक सरकारी वकील म्हणून झळकणार आहे. यापूर्वी सोज्वळ भूमिका साकारणाऱ्या अक्षयाची ही पहिलीच खलनायकी भूमिका असणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
पहिल्यांदाच खलनायिकेच्या भूमिकेत
अक्षया म्हणते, “२ वर्षांनी छोट्या पडद्यावर परतत आहे याचा खूप आनंद आहे. आतापर्यंत कधीच खलनायकी भूमिका केली नव्हती. आता एका कडक सरकारी वकिलाच्या रूपात मी प्रेक्षकांसमोर येतेय.”
आईचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद
अक्षया पुढे म्हणाली, “माझ्या आईला वकील व्हायचं होतं. त्यामुळे ही भूमिका करताना मला वाटतंय मी तिचं स्वप्न पूर्ण केलं. हे पात्र साकारताना मला तिचीच आठवण येते.”
साताऱ्यातील शूटिंगचा नवा अनुभव
“पहिल्यांदाच साताऱ्यात शूट करत आहे, त्यामुळे अनुभव खूप वेगळा आणि उत्साही आहे,” असंही अक्षयाने सांगितलं.
चॅनेल आणि निर्मात्यांचे आभार
“माझ्यावर विश्वास ठेवून ही संधी दिल्याबद्दल प्रोडक्शन आणि चॅनेलचे मी आभार मानते. ‘कॉन्स्टेबल मंजू’मधून एक वेगळं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळेल,” असा विश्वासही तिने व्यक्त केला.
न्यायालयीन संघर्षात रंगतदार ट्विस्ट
मंजू आणि सरकारी वकील यांच्यातील संघर्ष न्यायालयात कसा रंगतो, आणि सत्याच्या केसचा निकाल काय लागतो, हे पाहणं आता अधिकच उत्कंठावर्धक ठरणार आहे.
