‘१९ सप्टेंबरला फुटणार आतली बातमी!’

नव्या रहस्यकथेचा थरारक अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा
मराठी चित्रपटसृष्टीत सस्पेन्स आणि सॅटायर यांचा अनोखा संगम घेऊन ‘आतली बातमी फुटली’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत असून १९ सप्टेंबर २०२५ रोजी हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.

खुनाच्या सुपारीभोवती फिरणारा गंमतशीर खेळ
या चित्रपटात पती-पत्नीच्या ताणलेल्या नात्याच्या पार्श्वभूमीवर एक नवरा आपल्या पत्नीचा खून करवून घेण्यासाठी सुपारी देतो आणि या घटनेभोवती उभा राहतो एक रंजक आणि गमतीशीर खेळ. टीझरमध्ये मोहन आगाशेंच्या संवाद कौशल्याने आणि सिद्धार्थ जाधवच्या खुमासदार देहबोलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

मराठीतील अनेक दिग्गज या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार
चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, रोहिणी हट्टगंडी आणि सिद्धार्थ जाधव हे तगडे कलाकार पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. त्यांच्यासोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे आणि त्रिशा ठोसर यांचा सहभाग असून, एक दमदार कलाकार मंडळीची टीम या रहस्यमय कथा सादर करणार आहे.

दर्जेदार निर्मिती आणि जबरदस्त दिग्दर्शन हि या सिनेमाची जमेची बाजू
‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार यांनी केलं आहे. वीजी फिल्म्स बॅनरखाली ग्रीष्मा अडवाणी यांच्यासह विशाल पी. गांधी हे निर्माते असून अम्मन अडवाणी सहनिर्माता आहेत. सहयोगी दिग्दर्शक म्हणून जीवक मुनतोडे यांचा सहभाग आहे.

तांत्रिक बाजू आणि सर्जनशीलता यांचा योग्य समतोल
चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ यांनी, संकलन रवी चौहान यांनी केलं आहे. संगीत दिग्दर्शक एग्नेल रोमन यांनी पार्श्वसंगीताला योग्य साथ दिली आहे. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी तर नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे आणि तिजो जॉर्ज यांचं आहे. संवाद जीवक मुनतोडे व अद्वैत करंबेळकर यांनी लिहिले आहेत. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आणि कास्टिंग डिरेक्टर जोकीम थोरास आहेत. कार्यकारी निर्माते अब्दुल खान, तर वितरणाची धुरा फिल्मास्त्र स्टुडिओजकडे आहे.

मनोरंजनाची ‘आतली बातमी’ चित्रपटगृहात उलगडणार
रहस्य, विनोद, उत्तम कलाकार आणि गूढतेचा भार असलेला ‘आतली बातमी फुटली’ प्रेक्षकांना थरारक अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. १९ सप्टेंबर रोजी तो आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला विसरू नका!

Leave a comment