‘झी रायटर्स रूम’च्या माध्यमातून देशभरातील नव्या दमाच्या स्क्रीनरायटर्सचा शोध

झी एंटरटेनमेंटचा लॅन्डमार्क उपक्रम घोषित
१५ जुलै २०२५, मुंबई – झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेड (झी) या आघाडीच्या कंटेंट आणि टेक्नॉलॉजी पॉवरहाऊसकडून ‘झी रायटर्स रूम’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. नव्या आणि होतकरू पटकथालेखकांचा शोध घेऊन त्यांना व्यावसायिक संधी मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

सर्जनशीलतेला व्यासपीठ देणारी चळवळ
‘झी रायटर्स रूम’ ही फक्त टॅलेंट हंट नसून ‘युअर्स ट्रुली, झी’ या ब्रँडच्या मूल्यांशी सुसंगत असलेली एक सर्जनशील चळवळ आहे. झीच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर दर्जेदार कंटेंट निर्माण करण्यासाठी नव्या दृष्टिकोनाच्या लेखकांची निवड या माध्यमातून केली जाणार आहे.

७ भारतीय भाषांमध्ये घोषणा, ८० शहरांमध्ये अंमलबजावणी
या उपक्रमाची घोषणा मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या सात भाषांमध्ये करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी देशभरातील ८० शहरांमध्ये ३२ कार्यक्रम केंद्रांवर निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

भविष्यातील लेखकांसाठी संधींचे दालन उघडणार
टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट माध्यमांमध्ये नव्या कथांची निर्मिती करणाऱ्या लेखकांचा शोध घेऊन त्यांना झीच्या कंटेंट इकोसिस्टममध्ये सामावून घेणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. निवडले गेलेले लेखक विशेष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेऊन कथा सादर करतील.

झीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
झीचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर राघवेंद्र हुंसूर म्हणाले, “लेखन ही आमची खरी ताकद आहे. ‘झी रायटर्स रूम’च्या माध्यमातून आम्ही नव्या आवाजांना आकार देणार आहोत, जे पुढच्या पिढीच्या प्रभावी कथा रचतील.”

झीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक महादेव म्हणाले, “या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही विविध भाषांमधील कथा सांगणाऱ्या लेखकांचा समुदाय उभा करत आहोत.”

झी ईस्ट-नॉर्थ क्लस्टरचे सम्राट घोष म्हणाले, “बंगालमधील प्रतिभावंत लेखकांसाठी हे आधुनिक व्यासपीठ आहे.” तर झी साउथ-वेस्ट क्लस्टरचे सिजू प्रभाकरन यांनी म्हटलं, “या उपक्रमातून दक्षिण व पश्चिम भारतातील सर्जनशील परंपरेला नवी दिशा मिळेल.”

केवळ पात्र लेखकांनाच संधी, नव्या प्रतिभेला प्राधान्य
‘झी रायटर्स रूम’ केवळ लेखनाचे प्राथमिक धडे देणारा उपक्रम नसून, ज्यांच्यात आधीच कल्पनाशक्ती आणि लेखनकौशल्य आहे अशा नवोदित लेखकांना व्यावसायिक रूपात घडवण्यासाठी आहे. कॉलेज फेस्टिव्हल्स, रायटिंग क्लब्स किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर चमक दाखवलेल्यांना या उपक्रमात प्रवेश मिळू शकतो.

१०० लेखकांच्या निवडीसाठी तीन टप्प्यातील प्रक्रिया
लेखी चाचणी
सादरीकरण मूल्यांकन
मुलाखत प्रक्रिया
या तीन टप्प्यांतून निवड होणार असून, अंतिमतः १०० प्रतिभावंत लेखक ‘झी रायटर्स रूम’चा भाग होतील.

नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या
http://www.zeewritersroom.com या संकेतस्थळावर इच्छुक लेखकांनी नोंदणी करावी.

आजच सहभागी व्हा आणि बनवा उद्याचे महान पटकथालेखक!

Leave a comment