मुरांबा मालिकेतल्या ७ वर्षांच्या लीपनंतर समोर आला रमाचा नवा लूक

अक्षयपासून दुरावल्यानंतर रमाचं पाचगणीतील नवीन आयुष्य

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’मध्ये आता एक नवा अध्याय सुरू झालाय. कथानकात सात वर्षांचा लीप आल्यानंतर रमा आणि अक्षय यांच्या नात्यात मोठा बदल झाला आहे. गैरसमजांमुळे रमा आणि अक्षय वेगळे झाले आणि अक्षयने आपल्या मुली आरोहीसोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली. दुसरीकडे, रमा आता पाचगणीत नव्या ओळखीने जगू पाहते आहे.

रमाचा नवा लूक – वेण्या कापलेल्या, आत्मविश्वास अधिक ठाम

गेल्या अनेक भागांमध्ये रमाला प्रेक्षकांनी दोन वेण्यांमध्ये पाहिलं होतं. मात्र लीपनंतर रमाचा संपूर्ण लूक बदललेला आहे. तिने भूतकाळाला मागे टाकत दोन वेण्या कापून टाकल्या आहेत. आता ती पाचगणीतल्या सर्वात मोठ्या शाळेची ट्रस्टी आहे आणि तिच्या व्यक्तिमत्त्वात अधिक आत्मविश्वास झळकतो. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेली, स्वतंत्र निर्णय घेणारी आणि अधिक ठाम असणारी ही नवी रमा आता जगासमोर आहे.

लेकीसाठीच रमाचं मन गोड राहिलं, पण तोंडात गोड नाही

जरी रमा भूतकाळ मागे टाकण्याचा प्रयत्न करत असली, तरी आपल्या लेकीला ती विसरू शकलेली नाही. आपल्या लेकीला ‘बबडू’ असं प्रेमाचं नाव तिने दिलं आहे. तिच्यापासून दुरावल्यानंतर रमाने स्वतः गोड खाणं सोडलं आहे. ती इतरांना गोड खायला घालते, पण स्वतः काहीच गोड खात नाही – हे तिच्या अंतर्मनातील वेदना अधोरेखित करतं.

पुढच्या भागांमध्ये काय घडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष

आता मालिकेच्या आगामी भागांमध्ये रमाची आणि तिच्या मुलीची भेट होणार का? रमा आणि अक्षय पुन्हा एकत्र येणार का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे. तेव्हा नक्की पाहा ‘मुरांबा’ – दररोज दुपारी १.३० वाजता, फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a comment