
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘पारू’ यांचा महासंगम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या विशेष भागात जुन्या आठवणी, गैरसमज, मैत्री आणि मंगळागौरीच्या रंगतदार स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या कथानकाला आणखी रोचक वळण मिळणार असून, यात अभिनेत्री निर्मिती सावंत एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
निर्मिती सावंतची दमदार एन्ट्री – पद्मावती घोरपडेच्या रूपात झळकणार
या महासंगमात निर्मिती सावंत ‘पद्मावती घोरपडे’ ही भूमिका साकारणार आहेत. ही व्यक्तिरेखा लक्ष्मी आणि अहिल्याची जुनी कॉलेजमधली मैत्रीण असून, तिच्या मनात अजूनही काही जुन्या गोष्टींबद्दल राग आहे. तिच्या मते कॉलेजमध्ये लक्ष्मी आणि अहिल्याने तिची थट्टा केली होती आणि ती संधी साधून दोघींना मंगळागौरीच्या स्पर्धेचं थेट आव्हान देणार आहे.
मंगळागौरीचं आव्हान – घराच्या अस्तित्वासाठी लढणार लक्ष्मी आणि अहिल्या

लक्ष्मी आणि अहिल्या सुरुवातीला मौन बाळगतात. पण जेव्हा पद्मावती लक्ष्मीचं भाड्याचं घर विकत घेऊन तिला घराबाहेर काढायची धमकी देते, तेव्हा त्या स्पर्धेत उतरायचं ठरवतात. अहिल्या या स्पर्धेसाठी खास टीम तयार करते. मात्र यात मोठा ट्विस्ट असतो – ही टीम आधीच पद्मावतीने विकत घेतलेली असते!
घराच्या स्त्रिया एकत्र – स्वाभिमानासाठी संघर्ष
ही स्पर्धा आता फक्त मनोरंजनापुरती मर्यादित राहणार नसून, घरच्या स्वाभिमानासाठी लढा ठरणार आहे. लक्ष्मी आणि अहिल्याच्या पाठीशी त्यांचं संपूर्ण कुटुंब उभं आहे. घरातील सर्व स्त्रिया एकत्र येऊन घराच्या अस्तित्वासाठी मंगळागौरीच्या स्पर्धेत आपली ताकद दाखवणार आहेत.
स्पर्धा की संघर्ष? – पद्मावतीचा गैरसमज दूर होणार की वाद वाढणार?
आता ही मंगळागौर स्पर्धा कोण जिंकणार? पद्मावतीचा गैरसमज दूर होणार का? की स्पर्धेचा हा खेळ आणखी मोठा संघर्ष निर्माण करणार? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ महासंगम, संध्या ७:३० वाजता, फक्त तुमच्या झी मराठीवर!
