सबसे कातील गौतमी पाटीलचं ‘राणी एक नंबर’ गाणं प्रदर्शित

पिवोट म्युझिक प्रस्तुत भन्नाट गाणं
पिवोट म्युझिक प्रस्तुत ‘राणी एक नंबर’ हे भन्नाट गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. बॉलिवूड स्टाईल आणि ग्राफिक्सचा वापर करून तयार झालेलं हे गाणं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. गायिका सोनाली सोनवणे हिने आपल्या सुमधूर आवाजात गाण्याला जिवंत केलं आहे, तर गौतमी पाटील हिच्या अदांनी गाण्याला वेगळीच रंगत आणली आहे.

निर्मिती आणि सादरीकरण
या गाण्याचे बोल रोहन साखरे यांनी लिहिले असून, दिग्दर्शनाची धुरा कैलाश पवार यांनी सांभाळली आहे. प्रसिद्ध संगीतकार मोहन उपासनी यांनी संगीत दिलं असून, संगीत नियोजन मोहन उपासनी आणि संकेत गुरव यांनी केलं आहे. गाण्याची कोरिओग्राफी गोपी बैरागी आणि निलेश भोर यांनी केली असून, प्रोजेक्ट हेड विनया सावंत आहेत. गाण्याची पब्लिसिटी फॉरेवर पीआर या कंपनीमार्फत केली जात आहे.

गौतमी पाटीलची प्रतिक्रिया

गाण्याबाबत बोलताना गौतमी पाटील म्हणाली, “या गाण्याच्या नावातच ‘राणी एक नंबर’ आहे, त्यामुळे गाणंही एक नंबरचं असणार हे तुम्हाला कळालंच असेल. मला या गाण्याच्या शूटदरम्यान खूप मजा आली. मला खात्री आहे की प्रेक्षक नक्कीच या गाण्यावर थिरकतील. मी पिवोट म्युझिक आणि संगीतकार मोहन उपासनी यांची आभारी आहे.”

सोनाली सोनवणेची अनुभवकथन
गायिका सोनाली सोनवणे म्हणाली, “‘राणी एक नंबर’ हे कम्प्लीटली फीमेल सेंट्रिक गाणं आहे. एक आत्मविश्वासू मुलगी काय बोलेल याचा विचार करून मी हरकती घेतल्या. गाणं गाताना मला खूप मजा आली आणि प्रेक्षकांचा मिळणारा सुंदर प्रतिसाद पाहून आनंद वाटतो.”

संगीतकार मोहन उपासनी यांचे मत
संगीतकार मोहन उपासनी म्हणाले, “एक नंबर हा शब्द डोक्यात घोळत होता आणि त्यावरच हे गाणं बनवलं. आज या गाण्याला प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळतोय. ‘राणी एक नंबर’ इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगमध्ये असून, पिवोट म्युझिक नेहमीच उत्तम गाणी घेऊन येईल.”

Leave a comment