झी मराठी अवॉर्ड्स २०२५ – “सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा!”

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मतदान प्रक्रियेचा शुभारंभ
महाराष्ट्रातील प्रत्येक घराचा अविभाज्य भाग बनलेली झी मराठी घेऊन आली आहे वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित सोहळा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५!’ या वर्षाची थीम आहे “सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा!”, ज्यात प्रेक्षक आणि कलाकार यांचं खास नातं साजरं होणार आहे. या भव्य सोहळ्याच्या मतदान प्रक्रियेचा शुभारंभ गणपती बाप्पाच्या चरणी, ढोल-ताशाच्या गजरात भक्तिभावपूर्ण वातावरणात करण्यात आला.

लाडक्या कलाकारांच्या उपस्थितीत पारंपरिक आरती

झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांनी या शुभारंभाला हजेरी लावली. जयंत-वेंकी (लक्ष्मी निवास), कमळी-ऋषी (कमळी), अंबिका-अथर्व (तुला जपणार आहे) यांनी गणरायाची आरती करून आपल्या मालिकेला आणि सहकलाकारांना विजयी करण्यासाठी आशीर्वाद घेतले. पारंपरिक सजावट, मंगल वातावरण आणि कलाकारांची उपस्थिती या सर्वामुळे सोहळ्याची शोभा वाढली.

प्रेक्षकांना मतदानाचे आवाहन
कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधत आपल्या आवडत्या कलाकारांना आणि मालिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यांनी नमूद केलं की ही केवळ स्पर्धा नाही, तर प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील प्रेमाचं आणि विश्वासाचं सुंदर प्रतिबिंब आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर मतपत्रिकेद्वारे मतदान होणार असून, झी५ अॅपवरही प्रेक्षकांना आपलं मत नोंदवता येईल.

संस्कृती, नाती आणि भावनांचा उत्सव
‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ हा केवळ एक अवॉर्ड शो नसून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा, कुटुंबातील नात्यांचा आणि प्रेक्षकांच्या भावनांचा एक भव्य उत्सव आहे. प्रेक्षकांना आपल्या मतांद्वारे आपल्या लाडक्या कलाकारांचा सन्मान करण्याची संधी मिळणार आहे.

तेव्हा पाहायला विसरू नका ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ – लवकरच सदैव तुमच्या झी मराठीवर.

Leave a comment