
हैदराबादमध्ये टाटा ग्रुपचा लक्झरी ब्रँड झोयाचा भव्य सोहळा
टाटा ग्रुपच्या लक्झरी ब्रँड झोया ने हैदराबादमध्ये आपला प्रतिष्ठित व्हिस्पर्स फ्रॉम द वैली कलेक्शन सादर केला. या कार्यक्रमाला ब्रँड अॅम्बेसेडर आणि बॉलिवूड स्टार सोनम कपूर यांच्यासोबत टायटन कंपनी लिमिटेडच्या ज्वेलरी डिव्हिजनचे सीईओ अजॉय चावला उपस्थित होते.
ग्लोबल फॅशन आयकॉन सोनम कपूरचा मोहक लूक

ग्लोबल फॅशन आयकॉन सोनम कपूरने या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी राहुल मिश्रा कूचरचा अप्रतिम गाऊन परिधान केला होता. त्यासोबत झोयाच्या नव्या कलेक्शनमधील स्प्रिंग सांग चोकर आणि इयररिंग्स घालून त्यांनी आपला लूक अधिक उठावदार केला.
निसर्गाच्या सौंदर्याची झलक दागिन्यांतून
या दागिन्यांमध्ये बर्फातील शांतता आणि सफरचंदांच्या हिरवाईची झलक सुंदरपणे दर्शवली होती. ह्या विशेष दागिन्यांनी सोनमच्या ग्लॅमरस व्यक्तिमत्त्वाला अधिक खुलवून तिचा लूक कार्यक्रमात उठावदार ठरवला.
