जगदंबेच्या अवताराला द्यायला पूर्णविराम – नवा षड्रिपू ‘काम कामिनी’

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवा टप्पा
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’ मध्ये षड्रिपूंचा प्रवास अधिकच रोमांचक होत चालला आहे. आधी मोह या षड्रिपूने प्रेक्षकांना थरारक अनुभव दिला होता. आता मालिकेत आणखी एक भयंकर, विध्वंसक रिपू काम कामिनीचे आगमन होणार आहे. या भूमिकेत बिग बॉस मराठी फेम अमृता धोंगडे दिसणार असून, प्रेक्षकांसाठी हा टप्पा एक वेगळाच अनुभव ठरणार आहे.

गूढ नृत्याविष्काराची रंगत
आगामी भागात रंगमंचावर गूढ लावणीचे सूर गुंजणार आहेत. ढोलकी, पेटी आणि तालाच्या ठेक्यावर अवतरलेली रहस्यमय नर्तिका आपल्या नृत्यातून एक आगळावेगळं तेज, गूढ शक्ती आणि भयंकर रहस्य प्रकट करणार आहे. या नाट्यमय अविष्कारातून मालिकेला एक नवा कलाटणी देणारा अध्याय सुरू होणार आहे.

काम कामिनीचे भयंकर रूप
हा नवा रिपू केवळ मोहक नाही, तर अत्यंत कपटीही आहे. तिच्या आगमनाने माया आणि जगदंबेच्या संघर्षाला नव्या परिमाणांची जोड मिळेल. महिषासुराने तिला पाठवण्यामागचा खरा हेतू काय, याचाही उलगडा होणार असून, प्रेक्षकांसाठी हा संघर्ष अधिक रंजक ठरणार आहे.

अमृता धोंगडेची भूमिका आणि अनुभव
या भूमिकेबद्दल अमृता धोंगडे म्हणाल्या – “मला बऱ्याच वर्षांनी पौराणिक मालिका करण्याची संधी मिळाली. कलर्स मराठीसारखी आध्यात्मिक आणि पौराणिक मालिकांना विशेष स्थान मिळवून देणारी वाहिनी ही मालिका सादर करत असल्याने ही भूमिका स्वीकारायचे ठरवले. ही भूमिका माझ्यासाठी खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. सुरुवातीला दडपण होते, पण मला विश्वास आहे की या भूमिकेतील दोन कंगोरे साकारताना प्रेक्षकांना नक्कीच आगळावेगळा अनुभव मिळेल.”

प्रेक्षकांसाठी खास निमंत्रण
‘आई तुळजाभवानी’ मालिकेतील हा नवा अध्याय प्रेक्षकांना भक्ती, थरार आणि आध्यात्मिकतेचा अद्भुत संगम देणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका – ‘आई तुळजाभवानी’ दररोज रात्री ९ वाजता, फक्त कलर्स मराठीवर.

Leave a comment