‘दशावतार’ कथा कोकणची, व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची – उद्धव ठाकरे

विशेष शोमध्ये ठाकरे कुटुंबीयांची उपस्थिती
‘दशावतार’ चित्रपटाचा विशेष शो उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धवजींसह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले, ज्येष्ठ अभिनेते मिलिंद गुणाजी, राणी गुणाजी आणि जागतिक कीर्तीच्या अभिनेत्री छाया कदम उपस्थित होत्या.

कलाकार आणि दिग्दर्शकांचे कौतुक
या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या कामाचं विशेष कौतुक केलं. तसेच चित्रपटातील कलाकार सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, अजित भुरे यांच्यासह संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं.

रूपेरी पडद्यावर अनुभवायला हवी भव्यता
मराठीत अनेक वर्षांनंतर असा भव्य चित्रपट पाहायला मिळाल्याचे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, ही भव्यता आणि सौंदर्य रसिकांनी रूपेरी पडद्यावरच अनुभवायला हवी. केवळ कोकणातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहावा, असं आवाहनही त्यांनी प्रेक्षकांना केलं.

निर्मात्यांचे अभिनंदन
‘दशावतार’ ने मराठी चित्रपटाला जी भव्यता मिळवून दिली त्याबद्दल झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर, निर्माता सुजय हांडे, दिग्दर्शक सुबोध खानोलकर, ओंकार काटे आणि इतर सर्व निर्मात्यांचं उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं.

Leave a comment