
नाट्य परिषदेचा करंडक महोत्सव
शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेल्या ‘नाट्यकलेचा जागर’ उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्रातील १९ केंद्रांवर प्राथमिक फेरी झाली. त्यानंतर निवडक २५ एकांकिकांची अंतिम फेरी १५ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा, मुंबई येथे रंगली.
कलावंतांसाठी विशेष कार्यशाळा
अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य परिषदेने त्यांच्या गावी जाऊन कार्यशाळांचे आयोजन केले. या कार्यशाळांना कुमार सोहोनी, संतोष पवार, राजीव तुलालवार, अद्वैत दादरकर, संतोष वेरुळकर, विजू माने, गणेश रेवडेकर, अमेय दक्षिणदास, प्रताप फड, मंगेश सातपुते, महेंद्र तेरेदेसाई, सचिन शिंदे, प्रदीप वैद्य आणि विश्वास सोहोनी अशा दिग्गज दिग्दर्शक व अभिनेत्यांनी मार्गदर्शन केले.
अंतिम फेरी व परीक्षक मंडळ
अंतिम फेरी उत्साहपूर्ण वातावरणात झाली. परीक्षक म्हणून विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, सुहास जोशी, रविंद्र पाथरे आणि सौरभ पारखे यांनी काम पाहिले. स्पर्धा समन्वयक म्हणून सतिश लोटके आणि डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी जबाबदारी पार पाडली.
मान्यवरांची उपस्थिती
या महोत्सवात सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, विजय गोखले, संजय मोने आणि निर्माते दिलीप जाधव उपस्थित होते. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले. उद्घाटन समारंभ अजित भुरे, सतिश लोटके, विजय गोखले, सयाजी शिंदे, उदय राजेशिर्के, चंद्रशेखर पाटील, शिवाजी शिंदे व विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाला. पारितोषिक वितरण सोहळा मोहन जोशी, प्रशांत दामले, भाऊसाहेब भोईर, विजय गोखले, संजय मोने, दिलीप जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
विजेते एकांकिका आणि कलावंत
- प्रथम क्रमांक : नाट्यशृंगार, पुणे – चिरंजीव परफेक्ट बिघडलाय
- द्वितीय क्रमांक : रंगायन, नागपूर – स्वतःची सावली
- तृतीय क्रमांक : नाट्यमय, कोल्हापूर – पारधी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : राहुल कुलकर्णी (चिरंजीव परफेक्ट बिघडलाय)
सर्वोत्कृष्ट लेखक : अमेय जगताप (स्वतःची सावली)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : गौरी पवार (पारधी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : अनिकेत देशमुख (चिरंजीव परफेक्ट बिघडलाय)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य : नाट्यशृंगार, पुणे (चिरंजीव परफेक्ट बिघडलाय)
सर्वोत्कृष्ट संगीत : रंगायन, नागपूर (स्वतःची सावली)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : नाट्यमय, कोल्हापूर (पारधी)
प्रशांत दामले यांचा संदेश
परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले म्हणाले की, नाटकात काम करण्यासाठी चिकाटी, शिकण्याची जिद्द आणि व्यसनांपासून लांब राहणे गरजेचे आहे. सहकाऱ्यांसोबत काम केल्यावरच नाटक सुंदर होते. फक्त बक्षीस मिळालं म्हणून यश ठरत नाही, तर चांगले काम करणाऱ्यांनाच व्यावसायिक रंगभूमीवर स्थान मिळते.
