
‘द टाईमलेस गाला’ची मंत्रमुग्ध करणारी संध्या
मराठी टेलिव्हिजनवरील प्रतिष्ठित असा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५ – सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा!’ या नामांकन सोहळ्याचे नेहमीप्रमाणेच भव्य आयोजन करण्यात आले. यावर्षी या सोहळ्याची थीम होती – “The Timeless Gala”, ज्यामध्ये झी मराठीवरील विविध मालिकांतील कलाकारांनी मोहक वेशभूषेत उपस्थित राहून कार्यक्रमात रंग भरले.

२६ वर्षांचा प्रवास आणि डबल सेलिब्रेशन
या वर्षीचा नामांकन सोहळा अधिक खास ठरला कारण झी मराठीने आपल्या यशस्वी प्रवासाची २६ वर्षे पूर्ण केली. त्यामुळे ही फक्त नामांकन पार्टी नव्हती, तर प्रवासाचं आणि आगामी अवॉर्ड्सचं डबल सेलिब्रेशन होतं. झी मराठी परिवारातील सर्व कलाकार एका छताखाली जमून आजवरच्या वाटचालीचा आनंद सामायिक करत होते.

नामांकनांसोबत वाढलेली उत्सुकता
कार्यक्रमादरम्यान जसजशी विविध श्रेणीतील नामांकने जाहीर होत होती, तसतशी उपस्थित कलाकारांची उत्सुकता आणि टाळ्यांचा कडकडाट वाढत होता. विशेष म्हणजे, कलाकार केवळ आपल्या मालिकेसाठीच नव्हे तर इतर मालिकांच्या कलाकारांनाही तितक्याच मनापासून शुभेच्छा देत होते. या स्नेहभावनेतून झी मराठीच्या संस्कृतीचं खरं दर्शन घडलं.
रेड कार्पेटवरची मोहक एन्ट्री
नामांकनांची घोषणा पूर्ण झाल्यानंतर कलाकारांनी त्यांच्या देखण्या वेशभूषेत रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. टॅक्सिडो, गाऊन्स आणि आकर्षक अदांमधून झी मराठीच्या स्क्रीनवरील परिचित चेहरे प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या रूपात आले.
उत्कंठा आता मुख्य सोहळ्याची
हा नामांकन सोहळा जितका उत्सवमय ठरला, तितकीच आता उत्कंठा लागून राहिली आहे ती मुख्य पुरस्कार सोहळ्याची. ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ हा अविस्मरणीय सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. तुमच्या लाडक्या कलाकारांचा सन्मान पाहण्यासाठी सदैव झी मराठीशी जोडलेले रहा.
