
इंडियाज गॉट टॅलेंटचा नवा सीझन रंगणार उत्साहात
इंडियाज गॉट टॅलेंटचा नवीन, बहुप्रतीक्षित सीझन लवकरच सुरू होत आहे आणि हा मंच उत्साहाने सळसळू लागला आहे. कारण प्रेक्षकांसमोर प्रतिभा, ग्लॅमर आणि मनोरंजन घेऊन येण्यासाठी नवज्योत सिंह सिद्धू, मलाइका अरोरा आणि शान एकत्र आले आहेत.
सिद्धूची शायरी ठरते आकर्षणाचा केंद्रबिंदू
एकीकडे, भारतातील काही अजब प्रतिभावंत मंचावर गजब क्षण उभे करत आहेत, तर सिद्धू आपल्या आकर्षक शीघ्र शायरीने त्याला प्रतिसाद देत त्यावर मस्तीचा एक अनोखा तडका देत आहे. आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने स्पर्धक चकित करत आहेत तर सिद्धू आपल्या मस्त, काव्यात्मक ढंगाने तो क्षण अधिक संस्मरणीय करत आहे.

मलाइका अरोरा प्रभावित, करणार लेखन
त्याच्या शायरीचा अविरत प्रवाह पाहून सगळ्यांना आश्चर्य तर वाटतेच, पण मलाइका त्याने फारच प्रभावित झाली आहे. ती इतकी प्रभावित झाली आहे की, सिद्धूच्या शायरीने प्रेरित होऊन एखादे पुस्तक लिहावे असे तिला वाटू लागले आहे. अशाच एका क्षणी जेव्हा सिद्धूने एका परफॉर्मन्सचा प्रतिसाद आपल्या शायरीने दिला, तेव्हा मलाइका न राहवून म्हणाली, “सारे जो आप बोल रहे हो ना, मुझे लिखना है.”
शोची टॅगलाइन आणि सामाजिक संदेश
या शोच्या प्रोमोमध्ये सिद्धू म्हणतो, “दुनिया में सबसे बडा रोग, मेरे बारे में क्या कहेंगे लोग”. या उद्गारांमधून समाजाच्या भीडेखातर मागे राहणाऱ्या प्रतिभावंतांचा संघर्ष दिसतो. हा शो अशा प्रतिभावान लोकांना समाजाच्या भीडेची बंधनं झुगारून निर्भीडपणे आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी उद्युक्त करतो.
‘जो अजब आहे, तो गजब आहे’ या टॅगलाइनखाली नवा प्रवास
इंडियाज गॉट टॅलेंटच्या पहिल्या प्रोमोमध्ये कार्यक्रमात काय बघायला मिळणार आहे, याची केवळ एक झलक दाखवली आहे आणि “जो अजब है, वो गजब है” या टॅगलाइनने या सीझनची भावना अचूकपणे टिपली आहे.
प्रसारणाची तारीख
‘इंडियाज गॉट टॅलेंट’ सुरू होत आहे, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी आणि दर शनिवारी व रविवारी रात्री ९:३० वाजता त्याचे प्रसारण करण्यात येईल, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर.
