मराठवाड्यावर ओढवलेल्या संकटासाठी गौतमी पाटीलचा मदतीचा हात

मराठवाड्यात अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला. पुराने केलेल्या या कहरात शेतीमाल, हातासरशी आलेली पिकं इतकंच नाहीतर अनेकांचे संसार वाहून गेले. आणि कित्येकांची स्वप्न चिखलात गाडली गेली. या काळात बहुतांश कलाकार गप्प बसले, तर काहींनी मदतीचा हात पुढे सरसावला. दरम्यान, मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगना गौतमी पाटीललाही शेतकऱ्यांच्या वेदना पाहवल्या नाहीत. यावेळी गौतमीने पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला.

गौतमी पाटीलची शेतकऱ्यांसाठी संवेदनशील मदत

गौतमीने तिच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं धाडस केलं. यावेळी तिने शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता दाखवत ५१ हजार रुपयांची मदत देऊ केली. ही मदत या संकटासाठी मोठी नसली तरी तिच्या डोळ्यांतील प्रामाणिकता केलेल्या मदतीच्या दुप्पट बोलली, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

नृत्याने थिरकवणारी गौतमी, माणुसकीने जिंकली मनं

गौतमी पाटीलने आजवर तिच्या नृत्याने साऱ्यांना थिरकायला भाग पाडले. संपूर्ण महाराष्ट्रात तिच्या नृत्याचा प्रचंड चाहतावर्ग आहे. तिचं नृत्य लोकांच्या डोळ्यांना मोहवणारं असतं, पण यावेळी तिच्यातील माणुसकी मनाला जिंकून गेली.

गौतमी पाटीलचं भावनिक वक्तव्य

याबाबत बोलताना गौतमी म्हणाली, “मी स्वतः मराठवाड्याची परिस्थिती बघितली आहे. शेतकऱ्यांची दुःख शब्दात मावणारी नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की, सर्वांनी एकत्र येऊन मदत करणं आवश्यक आहे.”

Leave a comment