प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम

कार्यक्रमाचे आयोजन

ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत, राष्ट्र सेवा दलाचे सैनिक आणि महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री दिवंगत प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्दे मित्रमंडळ आणि परिवाराच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता, नॅशनल कॉलेज, लिंकिंग रोड, वांद्रे (पश्चिम) येथे होणार आहे.

परिसंवादाचा विषय

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ‘सन्मानाचे मरण आणि शेवटचा उंबरठा’ या महत्त्वपूर्ण आणि समकालीन विषयावर परिसंवाद होणार आहे. या चर्चासत्रात
ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुमार केतकर,
स्त्रीरोगतज्ज्ञ आणि ‘लिव्हिंग वील’ संकल्पनेचे समर्थक डॉ. निखिल दातार,
आणि युवा पिढीचे धडाडीचे लेखक प्रा. अजित जोशी सहभागी होतील.
परिसंवादाचे समन्वयक — उदय दंडवते (कीर्तिमान संरचयिता, संस्थापक सोनीकरीम, सॅन फ्रान्सिस्को)
अध्यक्षपद — ज्येष्ठ विचारवंत रामदास भटकळ (संस्थापक, पॉप्युलर प्रकाशन)

संगीतमैफिलीचे सत्र

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘रंग अमन के’ या शीर्षकाखाली
एल्गार साथीचा फोक फ्युजन बँड
आणि बंकिम साँगकार यांच्या नवगीतांची मैफल सादर करण्यात येईल.

संपर्क

अधिक माहितीसाठी —
झेलम परांजपे : ८६५५०५२२७२
सुधीर देसाई : ९८२००६६३३७

Leave a comment