
एंटरटेन्मेंटची त्सुनामी घरात घोंघावणार
“ड्रामा, धक्का आणि धमाका” या तीन शब्दांची एकच ओळख म्हणजे राखी सावंत! आता हीच एंटरटेन्मेंटची वादळी लहर बिग बॉस मराठी सिझन ६ च्या घरात शिरणार आहे. पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून राखी सावंतची एन्ट्री निश्चित झाली असून, तिच्या आगमनाने घरात आधीच तयार झालेली सगळी समीकरणं, नाती, गटबाजी आणि गैरसमज अक्षरशः हादरून जाणार आहेत.
राखी सावंतची एन्ट्री म्हणजे गेमचं पूर्ण गणित बदलणार

कोणाशी मैत्री करायची, कोणाशी थेट वाद घालायचा, कोणाच्या नसा दाबायच्या आणि कोणाला भावनिक गोंजारायचं — हे सगळं राखीच्या खेळात नेहमीच अनपेक्षित असतं. त्यामुळे तिच्या एन्ट्रीनंतर प्रत्येक स्पर्धकाचा गेम बदलणार हे नक्की. घरात शांतता असेल, असा प्रश्नच उरत नाही. राखी म्हणजे सतत काहीतरी घडत राहणार, अशी हमीच!
‘राखी जाणार आणि गेम पालटणार’ — राखी सावंत
या एन्ट्रीबद्दल बोलताना राखी सावंत म्हणाली की, “राखी जाणार आणि गेम पालटणार. माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं आहे. मी घरात गेले की सगळ्यांचा आवाज गायब होतो. राखी सावंत घरात जाणार म्हणजे माझीच मर्जी चालणार. मी धम्माल करणार आहे. वेगवेगळे कॉस्च्युम्स, माझा गेम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बिग बॉससारखा प्लॅटफॉर्म सगळ्यांना मिळत नाही; मिळाला असेल तर त्याचा उपयोग करून घ्या, हेच माझं म्हणणं आहे.”
रितेश देशमुखांबद्दलही राखीची खास प्रतिक्रिया
राखी पुढे म्हणते की, शोचे होस्ट रितेश देशमुख अमेझिंग आहेत आणि उत्कृष्ट अभिनेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात बिग बॉस मराठी लोकप्रिय होत असल्याचा तिला अभिमान वाटतो आणि मराठी प्रेक्षकांसाठीच आपण हा शो करत असल्याचंही तिने ठामपणे सांगितलं.
ड्रामाचा लेव्हल अप, प्रेक्षकांसाठी फुल ऑन धमाका
राखी सावंतचा स्वभाव जितका बिनधास्त, तितकाच बेधडक तिचा खेळ. ती स्वतःच्या अटींवर खेळते आणि वेळ आली तर संपूर्ण घराची दिशा बदलते. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात राखीची एन्ट्री म्हणजे ड्रामाचं थेट लेव्हल अप ठरणार आहे.
दररोज रात्री ८ वाजता बिग बॉस मराठी सिझन ६
बिग बॉस मराठी सिझन ६ पहा दररोज रात्री ८ वाजता आपल्या लाडक्या Colors Marathi वाहिनीवर आणि कधीही JioHotstar वर.
