समीर आशा पाटील दिग्दर्शित “अमर प्रेम कथा” घेऊन येत आहे व्हॅलेंटाईन्स डेचा सर्वात ‘डेडली’ रोमान्स! पहिलं पोस्टर आऊट!!!

येत्या व्हॅलेंटाईन्स डेला प्रेमाला मिळणार आहे एक वेगळा ट्विस्ट!  एका अद्भुत प्रेमकथेला हॉरर आणि कॉमेडीची जोड मिळणार आहे.

या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.एका बाजूला जिवंत हात आणि दुसऱ्या बाजूला भुताटकी हात. तर या दोन्ही हातांच्या मध्ये काट्यांनी वेढलेलं लाल गुलाबाचं फूल आहे. पोस्टरमधूनच प्रेम आणि हॉररची खास झलक पाहायला मिळते त्यामुळे ही प्रेमकथा वेगळी असणार याची उत्सुकता वाढते.

‘सुपर डुपर’ सिनेमाच्या यशानंतर लेखक-दिग्दर्शक समीर आशा पाटील पुन्हा एकदा वेगळ्या विषयासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

मराठी इंडस्ट्रीतील आणि आजच्या घडीचे लोकप्रिय कलाकार या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. प्रथमेश परब, रितिका श्रोत्री, ओंकार भोजने, पार्थ भालेराव, रोहित माने, विनायक माळी आणि सयाजी शिंदे मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतील.

प्रेमाची भन्नाट गोष्ट, सोबत भुताटकीचा ट्विस्ट आणि हसून हसून लोटपोट करणारा विनोद! या आगळ्यावेगळ्या रोमँटिक हॉरर कॉमेडी जॉनरमधून साकारलेला हा चित्रपट तरुणाईसाठी मनोरंजनाची खास मेजवानी ठरणार आहे.

डॉ. पल्लवी जाधव, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, समीर आशा पाटील यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.

या सिनेमामुळे २०२७ चा व्हॅलेंटाईन चित्रपटगृहात वेगळा ठरणार हे नक्की.

‘अमर प्रेम कथा’ संपूर्ण महाराष्ट्रात या व्हॅलेंटाईन्स डेला मोठ्या पडद्यावर नक्की बघा !

Leave a comment